Jai Pawar  Sarkarnama
पुणे

Jay Pawar In Politics : अजितदादांचे धाकटे चिरंजीवही उतरणार राजकारणाच्या आखाड्यात; जय पवारांचे स्पष्ट संकेत...

NCP NEWS : अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही वारंवार बारामतीत आलं पाहिजे.

मिलिंद संगई

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार हे मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात उतरले आहेत. आता त्यांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे राजकारणाच्या आखाड्यात उतरण्याचे संकेत मिळाले आहेत. ‘अजितदादांनी ग्रीन सिग्नल दिला तर मी लगेच बारामतीत कामाला लागतो,’ असे सांगून त्यांनी राजकारणात उतरण्यास आपण तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Ajit Pawar's younger son Jai Pawar will also enter politics)

जय पवार हे आज बारामतीत आले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामतीतील कार्यालयाला भेट दिली आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष जय पाटील आणि बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष सचिन सातव हेही या वेळी उपस्थित होते. कार्यकर्त्यांनी त्यांना बारामतीत ॲक्विटव्ह होण्याची गळ घातली. त्यावेळी जय पवार यांनी आपल्या राजकीय इनिंगचा श्रीगणेशा अजितदादांच्या हातात असल्याचे स्पष्ट केले.

अजित पवार यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचे आहे, त्यामुळे तुम्ही वारंवार बारामतीत आलं पाहिजे. बारामतीत तुम्ही आता ॲक्टिव्ह व्हायला पाहिजे, अशी आग्रहाची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जय पवार यांच्याकडे केली. त्यावेळी जय पवार यांनी तुम्ही अजितदादांकडे याबाबत बोला. त्यांनी ग्रीन सिग्नल दिला की मी लगेच कामाला सुरुवात करतो, असे सांगितले.

दरम्यान, पार्थ पवार यांनीही बारामतीच्या राजकारणात लक्ष घातले आहे. त्यांच्यासोबत जय पवार यांनाही बारामतीत आणावे, असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आगामी काळात बारामतीच्या राजकारण जय पवार दिसले तर नवल वाटायचे नाही.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार हे शनिवारी प्रथमच बारामतीत आले होते. बारामतीकरांनी त्यांचे जोरदार स्वागत केले होते. उघड्या जीपमधून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवारही होते. तत्पूर्वी मुंबईत झालेल्या मेळाव्यात जय पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मागेच उभे होते. बारामती येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयास आज त्यांनी भेट दिल्याने त्यांचा राजकीय प्रवेश लवकरच होणार असल्याचे संकेत देणारा ठरत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT