Kasba By-Election Sarkarnama
पुणे

Kasba By-Election : अक्षय गोडसे यांचा व्हिडीओ : म्हणाले...माझा पाठिंबा हेमंत रासनेंनाच!

Kasba By-Election News : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे.

सरकारनामा ब्यूरो

Kasba By-Election News : कसबा पोटनिवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) माध्यमातून जोरदार प्रचार सुरु आहे. कसबा मतदार संघाची निवडणूक निहमीच गणपती मंडळांच्या भोवती फिरत आली आहे. मंडळाची भूमिका या निवडणुकीमध्ये महत्त्वाची असते.

त्याच प्रमाणे भाजपचे (BJP) उमेदवार हेमंत रासने हे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सव प्रमुख आहेत. त्यांच्या प्रचारासाठी भाजपने जीवाचे रान केले आहे. त्याच प्रमाणे दगडूशेठ गणपती मंदीरांचे विश्वस्तही त्यांच्यासाठी प्रचार करत आहेत.

अशातच दगडूशेठ हलवाई गणपती मंडळ ट्रस्टचे विश्वस्त अक्षय गोडसे यांच्या परिवाराने भाजपचे उमेदवार आणि मंडळाचे विश्वस्त हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात सोशल मीडियावर अक्षय गोडसे यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्यामध्ये ते म्हणाले, ''आमच्या परिवाराचा रासने यांना पाठिंबा आहे.''

''आम्ही अनेक दिवस हेमंत भाऊंसाठी काम करत आहोत. आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. मात्र, मतभेद दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे. कारण नसताना समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. पण असे कोणतेही मतभेद नाहीत. आम्ही त्यांच्या प्रचारात आहोत. माझ्या कुटुंबाकडून हेमंत रासने याना जाहीर पाठिंबा आहे,'' असे गोडसे म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी एक व्हिडीओ व्हायरल केला होता. त्या व्हिडीओमध्ये अक्षय गोडसे यांनी रविंद्र धंगेकर यांना पाठबळ असल्याचे म्हटले होते. या व्हिडीओची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. त्यानंतर अक्षय गोडसे यांनी हेमंत रासनेंना पाठिंबा असल्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT