Alandi News : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीस्थळी संजीवन समाधी सोहळ्याला आजपासून सुरुवात होत आहे. परंतु या सोहळ्यावरती 'आळंदी बंद'चं सावट आहे. देवस्थानच्या विश्वस्तपदी स्थानिकांना डावलल्या गेल्यामुळे ग्रामस्थांनी आज आळंदी बंदची हाक दिली आहे. यामुळे आता आळंदीत येणाऱ्या हजारो भाविकांची गैरसोय झाली आहे.
आळंदी येथे संजीवन सोहळा सुरू संपन्न होईपर्यंत दुकानं खुली होती, मात्र नंतर ही दुकानं बंद करण्यात आली. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी मंदिरासमोर ठिय्या आंदोलनं केलं आहे. यामुळे सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदीत येणाऱ्या भाविकांची मोठी गैरसोय होताना दिसत आहे. (Latest Marathi News)
या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता विश्वस्तांनी स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र विश्वस्तांनी बोलवलेल्या बैठकीला आपण जाणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. यामुळे आता यावर तोडगा निघणार तरी कसा? हा प्रश्न उद्भवला आहे.
आळंदी बंदच्या या आंदोलनामुळे आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. विश्वस्त पदासाठी वारकऱ्यांना वेठीस धरणे योग्य नाही. आणि हे माऊलींनी सु्द्धा पटलं नसतं, असा नाराजीचा सूर वारकऱ्यांमधूमन उमटू लागला आहे. तुमच्या स्थानिक राजकारणामुळे सामान्य वारकऱ्यांना का वेठीस धरता, अशी भावना वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.