Maharashtra Politics: ठाकरे गटाचा भोसरीसह खेड-आळंदी विधानसभा जागेवर दावा; शिरूर-हवेली जुन्नरही लढण्याच्या तयारीत

Maval Lok Sabha Constituency: आगामी लोकसभेला मावळात शिवसेना (ठाकरे) विरुद्ध शिवसेना (शिंदे) लढत होणार का?
Uddhav Thackeray Group
Uddhav Thackeray GroupSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : शिवसेनेने (ठाकरे गट) परवा मुंबईत लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. त्यात पुणे जिल्ह्यातील शिरूर मतदारसंघ महाविकास आघाडीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला सोडला, तर विधानसभेला तेथील अधिक जागा घेण्याची मागणी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडे केली.

मावळ आणि शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघासह त्यात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील तयारीवरही शिवसेनेच्या आढावा बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तालुकाप्रमुख, उप जिल्हाप्रमुख आणि जिल्हाप्रमुखांकडून ठाकरेंनी मतदारसंघातील २०१९ ची व सद्यस्थितीची माहिती घेतली.

महाविकास आघाडीच्या जागावाटपात कुठली जागा सोडायची आणि कुठल्या जागेवर दावा करायचा, याचा कानोसा घेतला. यावेळी पक्ष बांधणीवरही चर्चा झाली, असे या बैठकीला उपस्थित असलेले शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख अॅड.सचिन भोसले यांनी `सरकारनामा`ला सांगितले.

Uddhav Thackeray Group
Chhagan Bhujbal News: संभाजी भिडेंवरील विधानानंतर भुजबळांना धमकी; पोलीस प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

मावळ लोकसभा मतदारसंघात पहिल्यापासून शिवसेनेचा खासदार आहे. त्यामुळे यावेळी २०२४ ला तेथे तुल्यबळ उमेदवार दिला, तर विजयी होऊ, असा दावा या मतदारसंघातील पक्ष पदाधिकाऱ्यांनी मावळच्या आढावा बैठकीत केला. आतापर्यंत तेथे राष्ट्रवादी लढली असून पराजित झाली आहे. दुसरीकडे त्यांच्या तुलनेत शिवसेनेची ताकद मतदारसंघात त्यातही घाटाखाली जास्त असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मावळच्या तुलनेत शिरुरला शिवसेनेतील फुटीनंतर ठाकरे शिवसेनेची ताकद खूप कमी झाली आहे. कारण तेथील माजी खासदार व बहूसंख्य पदाधिकारी हे शिंदे शिवसेनेत गेले आहेत. तर, काहींनी भाजपची वाट धरली आहे.

त्यामुळे शिरुरवर तेथील ठाकरे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी मावळसारखा मोठा दावा केला नाही. मात्र, तो राष्ट्रवादीला सोडला, तर विधानसभेला तेथील निम्या जागा पक्षाकडे घेण्याची मागणी केली. त्याला या बैठकीला हजेरी लावलेले शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांनी त्याला दुजोरा दिला.

Uddhav Thackeray Group
Dhananjay Munde On Sanjay Raut : संजय राऊतांकडून अजितदादांच्या राजीनाम्याची मागणी,धनंजय मुंडेंचा पाराच चढला; म्हणाले, '' ते काय पवार...''

मी स्वतः शिरुर-हवेलीमधून लढण्यास तयार असल्याचे त्य़ांनी `सरकारनामा`ला सांगितले. खेड आणि जुन्नरवरही त्यांनी दावा ठोकला. तेथे पूर्वी पक्षाचे आमदार होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्याचवेळी जुन्नर आणि शिरुरच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची भूमिका स्पष्ट झाली नसल्याने त्यानंतर तसेच लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या जागांवर नेमका दावा करता येईल, असे ते म्हणाले.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com