Sharad Pawar News Sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरांमध्ये पोहाेचवणं गरजेचं : शरद पवार; भागवत वारकरी संमेलनास सुरुवात

Mangesh Mahale

Alandi : "सध्या समाजात चुकीची प्रवृत्ती पसरवली जात आहे, त्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली आहे. त्या सर्वांचं मन शक्तिमान करण्यासाठी भागवत वारकरी संप्रदायाचे काम मोठं आहे. समतेचा, माणुसकीचा संदेश घराघरांमध्ये पोहाेचवणं गरजेचं आहे, त्यासाठी भागवत वारकरी संप्रदायाने पुढाकार घेतला आहे," असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

भागवत वारकरी महासंघ आयोजित एकदिवसीय भागवत वारकरी संमेलन आज (ता. १) आळंदीजवळील चऱ्होली बुद्रुक येथील मुक्ताई लॉन्समध्ये होत आहे. या संमेलनात पवार बोलत होते. दिनकर शास्त्री भुकेले हे संमेलनाच्या अध्यक्षपदी आहेत. संत साहित्यावर परिसंवाद व चर्चासत्र होणार आहे.

"वारकरी संमेलनामुळे समाधान मिळत आहे. सामान्य माणसाची अवस्थता दूर करण्यासाठी जे पर्याय समोर आहेत. त्यामध्ये भागवत वारकरी संप्रदायाचा विचार आहे. आयुष्यभर समाजमन तयार करण्याचे काम करणारे संत, कीर्तनकारांचे योगदान मोठे आहे," असे पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले, "कुठलाही धर्म चुकीच्या प्रवृत्तीचे, संस्काराचे समर्थन करीत नाही. योग्य संस्कार देण्याची खबरदारी घेतात. हा विचार भागवत धर्माच्या माध्यमातून केला जात आहे. ज्ञानेश्वर, तुकारामांच्या दर्शनाने वारकऱ्यांना समाधान मिळते,"

शरद पवार हे आळंदी आणि जुन्नर दौऱ्यावर आहेत. त्या दौऱ्याची सुरुवात पवारांनी माऊलींचं दर्शन घेऊन केली. शरद पवारांनी २०१९ नंतर आज माऊलींचे दर्शन घेतले. या वेळी त्यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, माजी आमदार विलास लांडे उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT