Uday Samant News : मुघलांना संताजी-धनाजी दिसायचे तसे विरोधकांना एकनाथ शिंदे दिसतात; सामंतांचे ठाकरेंवर टीकास्त्र...

Maharashtra Politics : परदेश दौऱ्यावर भाष्य करणाऱ्या आदित्य ठाकरेंवरही सामंतांनी तोफ डागली.
Uday Samant Latest News
Uday Samant Latest News Sarkarnama
Published on
Updated on

Raigad : ठाकरे गटाकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर होत असलेल्या टीकेचा उद्योगमंत्री उदय सामंतांनी रायगडमध्ये चांगलाच समाचार घेतला. "मोगलांच्या सैनिकांनी धसका घेतल्याने त्यांना जसे सर्वत्र संताजी-धनाजी दिसायचे तसे विरोधकांना सर्वत्र एकनाथ शिंदे दिसतात, म्हणून सकाळपासून त्यांच्यावर ते टीका करतात,"असा टोला सामंतांनी कुणाचेही नाव न घेता लगावला.

मुख्यमंत्री शिंदे व सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या परदेश दौऱ्यावर भाष्य करणाऱ्या आदित्य ठाकरेंवरही सामंतांनी तोफ डागली. आदित्य ठाकरेंना माहिती देणारे चुकीचे माहिती देतात. "छत्रपती शिवाजी महाराज यांनी वापरलेली वाघनखं आणण्यासाठी मुनगंटीवार परदेशात जात आहेत, ही अभिमानास्पद बाब आहे,"असे सांगत टीका करणाऱ्या आदित्य ठाकरेंना सामंतांनी सडेतोड उत्तर दिले.

Uday Samant Latest News
Kunal Patil News : काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील यांच्या सूतगिरणीवर छापा; चोवीस तास उलटल्यानंतरही चौकशी सुरूच

उद्योगमंत्री सामंत हेही परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यावर स्पष्टीकरण करताना ते म्हणाले, "एमआयडीसीच्या अभ्यासासाठी परदेशात जात आहे. माझा दौरा पूर्ण झाल्यावर त्यांचा खर्च नेमका कुणी केला, याचा तपशील घेऊन आदित्य ठाकरेंनी तो जाहीर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे ब्रिटनच्या व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियममधून भारतात परत आणण्याबाबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आज ( रविवारी) लंडनला रवाना होत आहेत. आपल्या दौऱ्यात लंडनमधील टॅव्हिस्टोक चौकात २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमास ते उपस्थित राहतील.

Uday Samant Latest News
Maratha Reservation News : ओबीसी नेत्यांचा दावा जरांगे पाटलांनी खोडून काढला; म्हणाले,"आरक्षण मिळेपर्यंत सरकारला सुटी नाही..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com