Alandi Flood Sarkarnama
पुणे

Alandi Flood : पुरामुळे घरात अडकलेल्या 10 ते 15 जणांना नगरसेवकाने दोरीच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढले

Indrayani River Flood : इंद्रायणी नदीला पूर आल्याने आळंदीतील गोपाळपुरा परिसरात अडकलेल्या १० ते १५ नागरिकांची आदित्य घुंडरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोरीच्या साह्याने सुरक्षित सुटका केली.

विलास काटे

Alandi, 06 July : इंद्रायणीला पूर आल्यानंतर आळंदी शहरातील गोपाळपुरा भागातील एका इमारतीत 10 ते 15 जण अडकले होते. नगर परिषदतील विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे आणि त्यांच्या मित्र मंडळांनी पुराच्या पाण्यात शिरून दोरीच्या साह्याने अडकलेल्या लोकांची सुटका केली. त्यांच्या या कामाचे कौतुक होत आहे.

इंद्रायणी नदीला आलेल्या महापुराचे पाणी गोपाळपुरा भागातील अनेक धर्मशाळा आणि खासगी इमारतींमध्ये प शिरले होते. पुराचे वाढते पाणी पाहून नगरपरिषद प्रशासन आणि पोलिसांनी येथील नागरिकांना एकेक करून बाहेर येण्यास सांगितले होते. त्यानंतरही काही लोक पूर ओसरेल, या आशेने घरातच बसून राहिले आणि बाहेर पडण्यास नकार दिला.

पुराचे पाणी वाढत गेल्यामुळे घरात बसलेल्या लोकांची मोठी अडचण झाली. कारण महापुराचे पाणी वाढत गेले, त्यामुळे घरात अडकलेल्या लोकांची तारांबळ उडाली. त्यावेळी नगर परिषदेतील विरोधी पक्षनेते आदित्य घुंडरे यांनी पोलिस, नगरपरिषदेचे कर्मचारी आणि मित्रांच्या सहकार्याने पुराच्या पाण्यातील इमारतीत प्रवेश केला.

घरात अडकलेले वृद्ध तसेच काही तरुणांना दोरीच्या साह्याने बाहेर काढले. या सर्वांच्या धाडसी कामाचे आळंदी शहरात कौतुक होत आहे.

आळंदीचा पाणीपुरवठा ठप्प

इंद्रायणी नदीला आलेल्या पुराचे पाणी आळंदी नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्रात शिरले आहे. तसेच, आळंदीतील विविध ठिकाणच्या डीपी पाण्यात गेल्यामुळे शहरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे, त्यामुळे आळंदीकरांच्या नळाला अनिश्चित काळापर्यंत पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT