Ajit Pawar, Sunil Shelke, Dilip Mohite, Anna Bansode  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Deputy CM : पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे तीनही आमदार 'अण्णा' अजितदादांसोबत; तर...

सरकारनामा ब्यूरो

उत्तम कुटे -

Pimpri Chinchwad : महाराष्ट्रात वर्षभरात पुन्हा एकदा दुसरा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या समर्थकांसह बंड करत ते शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले. यावेळी पुणे जिल्ह्यातील तीनही अण्णा आमदार त्यात पिंपरीचे अण्णा बनसोडे, मावळचे सुनील शेळके आणि खेडचे दिलीप मोहिते पाटील हे अजितदादांसोबत आहेत.

पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे शिरूरचे खासदार अमोल कोल्हे हे ही अजित पवारां(Ajit Pawar)बरोबर रविवारी(दि.२ जुलै) राजभवनात उपस्थित होते. त्यातून तसेच त्यांची देहबोलीही ते अजितदादांबरोबर असल्याचे सांगून गेली. जिल्ह्यातील तीनही आमदार त्यांच्यासोबत आहेत. आणखी काही बरोबर येण्याची शक्यता आहे. त्यातून राष्ट्रवादी(NCP)चा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्यात अजितदादांचा वरचष्मा राहणार असल्याचं दिसून येत आहे.

पहाटेच्या शपथविधीच्या वेळी अजितदादांबरोबर त्यांचे कट्टर समर्थक आमदार अण्णा बनसोडे(Anna Bansode) हे शेवटपर्यंत कायम राहिले होते. यावेळी सुद्धा ते त्यांच्याबरोबरच कायम आहेत. उलट आणखी दोन आमदारांची त्यांना साथ मिळाली आहे. निरोप येताच या तीनही आमदारांनी भल्या सकाळीच आपला मतदारसंघ सोडला.

अजित पवारांचे निवासस्थान असलेल्या 'देवगिरी'वर ते धडकले.तेथून ते राजभवनवर आले. तेथे खा.कोल्हेंची साथ त्यांना मिळाली. खेड आणि मावळचे दोन्ही आमदारअण्णा अनुक्रमे मोहिते आणि शेळके यांनी आपण अजितदादांबरोबरच राहणार असल्याचे `सरकारनामा`ला मुंबई येथून बोलताना शपथविधीनंतर थोड्या वेळापूर्वी सांगितले.अजिदादांनी आम्हाला दुसऱ्या पक्षातून (मोहितेंना शिवसेना, तर शेळकेंना भाजपमधून) आणून निवडून आणले असल्याने त्यांची साथ कशी सोडणार अशी उलट विचारणा या दोन्ही आमदार अण्णांनी केली.

दरम्यान जुन्नरचे आमदार अतुल बेनके कोणा सोबत जाणार या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बेनके यांचे वडिल वल्लभ बेनके या तीनवेळा जुन्नरचे आमदार राहिलेले आहेत. ते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तर त्‍यांच्‍या नंतर अतुल हे आमदार म्हणुन निवडुन आल्यांनंतर ते देखील शरद पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र आजच्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी सबुरीची भुमिका घेत अद्याप आपली भुमिका जाहीर केलेली नाही.

दिलीप वळसे-पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्यासारखे साहेबांच्या मर्जीतील दिग्गज नेते दादांबरोबर आले,तर आम्ही का नाही असे आ.मोहिते म्हणाले.ते राजभवनात दादांच्या आजच्या शपथविधीला पहिल्या रांगेत होते. तर, आ. सुनीलअण्णांचा तेथील वावरही (देहबोली)खूप काही सांगून गेला. जिथे दादा,तिथे मी असं आमदार अण्णा बनसोडे 'सरकारनामा'शी बोलताना सांगितलं आहे.

अतुल बेनके तळ्यात मळ्यात...

दरम्यान, जुन्नरचे आमदार अतुल बेनके कोणा सोबत जाणार या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. बेनके यांचे वडिल वल्लभ बेनके या तीन वेळा जुन्नरचे आमदार राहिलेले आहेत. ते शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. तर त्‍यांच्‍या नंतर अतुल हे आमदार म्हणुन निवडुन आल्यांनंतर ते देखील शरद पवार समर्थक म्हणून ओळखले जातात. मात्र आजच्या राजकीय नाट्यानंतर त्यांनी सबुरीची भूमिका घेत अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT