Jayant Patil On Shivsena : 'त्या' शिवसेनेच्या आमदारांना आता पुन्हा माघारी फिरण्याची संधी; जयंत पाटलांचा मिश्किल टोला

NCP Political News : '' ...म्हणून विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडेच राहणार!''
 Jayant Patil ; Shivsena
Jayant Patil ; ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : '' अजितदादांमुळेच काही आमदार शिवसेनेतून बाहेर पडले होते. आणि आमचं महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यात भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आलं. पण आता अजितदादा युती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्या आमदारांना पुन्हा एकदा माघारी फिरण्याची संधी आहे'' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी शिंदे गटाला लगावला.

जयंत पाटील यांनी मुंबईत रविवारी(दि.२ जुलै) माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीतील बंडखोरीवर भाष्य करतानाच भाजपा शिवसेनेलाही टोले लगावले आहेत. पाटील म्हणाले, मागील वर्षी भाजपने शिंदे गटाला सोबत घेताना त्यांच्यासोबतच्या आमदारांना अनेक आश्वासनं दिली होती.अद्यापही शिंदे गटातील अनेकजण मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. पण त्यांच्याअगोदर अजित पवारांसह गेलेल्या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यामुळे आता त्यांच्यावर काय वेळ आली हे पाहा असा मिश्किल टोलाही पाटलांनी लगावला.

 Jayant Patil ; Shivsena
Sharad Pawar on Ajit Pawar: भविष्यातील आश्वासक चेहरा कोणता...? शरद पवारांनी दिलं उत्तर...

तसेच विधानसभेत सर्वात जास्त संख्याबळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा(NCP)चं आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद आमच्याकडेच राहणार आहे. आणि विधानसभेतील आमचा मुख्य प्रतोद म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करत असल्याचंही जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.

महाराष्ट्रात महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi )च्या शरद पवार, उध्दव ठाकरे आणि राहुल गांधींनी खूप मिळालं आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात महाविकास आघाडीची ताकद लवकरच दिसेल असा विश्वासही पाटलांनी यावेळी व्यक्त केला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदे फडणवीस सरकारला पाठिंबा नाही अशी स्पष्ट भूमिकाही त्यांनी मांडली. तसेच ईडी प्रकरणावर मी पुढे कधीतरी सविस्तर भाष्य करेल. ज्या ज्यावेळी असे पक्षावर असे संकटं येतात तेव्हा शरद पवारां(Sharad Pawar)च्या पाठीशी पक्षाचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीनं उभा राहतो असंही पाटील यावेळी म्हणाले.

 Jayant Patil ; Shivsena
Maharashtra Politics: राष्ट्रवादीचा शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा नाही; जयंत पाटलांनी पक्षाची भूमिका केली जाहीर

अजितदादांसोबत कितीजण आहेत याविषयी अद्याप स्पष्टता नाही. पण ९ जण आहेत. ज्यांनी शपथ घेतली. बाकीचे जे काही लोक होते ते शपथविधी पाहायला गेले होते असा चिमटाही पाटील यांनी काढला. तसेच ज्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यांना कायदेशीर अडचणी येऊ शकतात असा इशाराही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंडखोरी केलेल्या आमदारांना दिला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com