अमित शहा  सरकारनामा
पुणे

पुणे महापालिका निवडणुकीकडे अमित शहांचे आहे लक्ष

कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करा.संघटनेचा पूर्ण क्षमतेने वापर करा.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : गेल्या साडेचार मेट्रो, पाणी पुरवठा योजनेसह, पीएमपीच्या नव्या बसची खरेदी अशी अनेक महत्वपूर्ण कामे झाली आहेत. ही कामे पुणेकरांपर्यंत पोचविताना आपण एकटे निवडून येण्यापुरते न पाहता संपूर्ण पॅनेल कसा निवडून येईल, याची काळजी करा,असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात सांगितले.पुण्याच्या निवडणुकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे लक्ष असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम करा.संघटनेचा पूर्ण क्षमतेने वापर करा. महापालिकेत पुन्हा सत्ता येण्यासाठी एकट्याने निवडून येण्याची तयारी करण्याऐवजी पूर्ण पॅनल निवडून कसा येईल याचा विचार करा, असे सांगितले.शहर भाजपाच्यावतीने ‘महापालिका २०२२’ ही दोन दिवसांचा अभ्यास वर्ग घेण्यात आला.आज दुसऱ्या दिवशी कसबा, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा अभ्यास वर्ग झाला.

पक्ष संघटना मजबूत करण्याकडे लक्ष द्या असा आदेश देतानाच गेल्या साडेचार वर्षात आपण चांगल्या पद्धतीने काम केले आहे. शहरातील अनेक मोठे प्रकल्प मार्गी लावले आहेत. या कामाच्या जोरावर आपण नागरिकांमध्ये गेले पाहिजे. तीनचा प्रभाग असला तरी यावेळीही १०० पेक्षा जास्त नगरसेवक निवडून येऊ शकतो, पण यासाठी आपण एकटे निवडून न येता पूर्ण पॅनल आले पाहिजे यादृष्टीने तयारी करा, पुणे महापालिकेच्या निवडणुकीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचेही लक्ष आहे, असे पाटील यांनी बैठकीत सांगितल्याचे नगरेसवकांनी सांगितले.

खासदार बापट यांनी नगरसेवकांना जनसंपर्कावर भर देण्याचा सल्ला दिला. आपण प्रभागात फिरताना नागरिकांशी संवाद साधला पाहिजे. केवळ कारमधून न फिरता दुचाकी वापरा, चालत फिरता आले तर चांगलेच झाले. जेथे संपर्क कमी आहे, तेथे संपर्क वाढवा, नागरिकांच्या सुखदुःखात आपण सहभागी झाले पाहिजे, यादृष्टीने नगरसेवकांनी काम करावे, असे बापट यांनी बैठकीत सांगितले. महापौर मोहोळ यांनी भाजपची सत्ता आल्यानंतर कोणती कामे झाली याची माहिती दिली. सभागृहनेते बीडकर यांनी विरोधी पक्ष एकत्र आले तरी भाजपसाठी निवडणूक कशी सोपी आहे याची मांडणी केली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT