किरीट सोमय्या म्हणाले; हसन मुश्रिफांना तुरूंगात जावेच लागणार

Kirit Somaiya
Kirit SomaiyaSarkarnama
Published on
Updated on

पुणे : ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ आणि त्यांच्या जावयांनी केलेल्या घोटाळ्याचा पाठपुरावा आपण सोडणार नाही. कारखान्यात आणि ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टमध्ये त्यांनी केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणात त्यांना तुरूंगात जावे लागणार असल्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरीट सोमय्या यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे बोलताना सांगितले.

राज्यातील ग्रामपंचायतींसाठी केंद्र सरकारच्या निधीतून असलेल्या पंधराशे कोटी रूपयांच्या योजनेत मुश्रिफ यांनी घोटाळा केल्याचा आरोप सोमय्या यांनी यापूर्वी पुण्यात बोलताना केला होता. या आरोपाचा पुनुरूच्चार त्यांनी आज केला. ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्टमध्ये केलेल्या घोटाळ्याची तक्रार आपण केंद्रीय ग्राम विकास विभागाच्या सचिवांकडेदेखील केल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

Kirit Somaiya
मंगल कार्यासाठी कमाल उपस्थितीचे बंधन उठवा

सोमय्या यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यानंर सोलापूर येथेही कार्यकर्त्यांशी संवान साधला.ग्रामविका मंत्री मुश्रिफ यांच्यासंदर्भात एकुण तीन तक्रारी करण्यात आल्या आहेत. यातील दोन तक्रारी मुश्रिफ व त्यांचे जावई यांच्या विरोधात साखर कारखान्या संदर्भात आहे. या प्रकरणात शंभर कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तिसरी तक्रार ग्रामविकास विभागाकडून ग्रामपंचायतींसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनेतील पंधराशे कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारासंदर्भात आहे. या तीन्ही तक्रारी संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे सोमय्या यांनी स्पष्ट केले.

Kirit Somaiya
अबब...! लाचखोर नितीन ढगेच्या घरात सापडली तब्बल सव्वा कोटीची रोकड

राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढत असल्याने मिडीया आणि सोशल मिडीयात सोमय्या यांच्या नावाची सातत्याने चर्चा होते. या पाश्‍र्वभमूीवर आजचा सोलापूर दौरा होता. या काळात सोमय्या सोलापूरला पहिल्यांदाच गेल्याने त्याची सोशल मिडीयात विशेष चर्चा झाली.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com