Union Home Minister Amit Shah and Sunetra Pawar during a key political meeting that has triggered discussions over the Maharashtra cabinet expansion. sarkarnama
पुणे

Sunetra Pawar Meet Amit Shah : पुण्यात अमित शाह- सुनेत्रा पवारांमध्ये बैठक; मंत्रिमंडळ विस्तारात...

Cabinet Expansion : पुणे दौऱ्यावर असलेले गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

Roshan More

Sunetra Pawar News : लोकमान्य टिळक पुरस्काराच्या वितरणासाठी देशाचे गृहमंत्री अमित शाह हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या हस्ते हा पुरस्कार अजित डोवल यांना प्रदान करण्यात आला. दरम्यान, या सोहळ्याच्या पूर्वीच अमित शाह आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली.

'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आणि महायुतीच्या धोरणांवर या बैठकीत चर्चा झाली. शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर सुनेत्रा पवार आणि अमित शाह यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सुनेत्रा पवार यांनी अजित पवारांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रकल्पांना गती मिळावी, अशी मागणी देखील गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केल्याची माहिती आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारामध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून दोन केंद्रीय आणि एक राज्यमंत्रिपदावर दावा करण्यात आल्याची माहिती आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील एक कॅबिनेट मंत्रि‍पदाची मागणी करण्यात आल्याची माहिती आहे. स्वतंत्र कार्यभार असलेले मंत्रिमंडळ मागील वेळी राष्ट्रवादीला देण्याची ऑफर होती.मात्र, कॅबिनेट मंत्रि‍पदासाठी हे ऑफर राष्ट्रवादीने स्वीकारली नव्हती.

मंत्रि‍पदासाठी कोणाला संधी?

राष्ट्रवादीकडून लोकसभेमध्ये सुनील तटकरे हे एकमेव खासदार आहेत. तर राज्यसभेत पार्थ पवार आणि प्रफुल पटेल आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला एक मंत्रिपद आले तर त्यावर कोणाला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT