Modi Gen Z Video : 'फेसबुक मुख्यमंत्री' म्हणणारे आज इन्स्टाग्रामवर सक्रिय; मोदींच्या सलग 3 व्हिडिओंवरून संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Sanjay Raut compares BJP Instagram campaign with criticism once aimed at Uddhav Thackeray : जंतर-मंतरवरील Gen-Z आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सलग तीन व्हिडिओ; उद्धव ठाकरेंवरील जुन्या टीकेचा दाखला देत राऊतांची भाजपवर टीका.
Modi Gen Z Video
Modi Gen Z VideoSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena UBT criticism of BJP social media campaign : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या Gen-Z आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरुणांशी थेट संवाद साधण्यासाठी इन्स्टाग्रामचा वापर वाढवला आहे. गेल्या काही दिवसांत त्यांनी सलग तीन व्हिडिओ शेअर करत विद्यार्थी, युवक आणि समाजाशी संवाद साधला.

याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सोशल मीडियाच्या मुद्द्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

संजय राऊत (Shivsena UBT) यांनी त्यांच्या एक्स (X) खात्यावर पोस्ट करत म्हटले की, "उद्धवजींना 'फेसबुक नेता' म्हणणारे आज स्वतः इन्स्टाग्रामवर रोज व्हिडिओ अपलोड करत आहेत. फेसबुकवरून जनतेशी संवाद साधत आहेत. मोदी सरकार म्हणजे फेसबुक सरकार! कालाय तस्मै नमः." या पोस्टद्वारे त्यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर उपरोधिक टीका केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर Gen-Zच्या आंदोलनानंतर आतापर्यंत तीन वेळा सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संवाद साधला आहे. पहिला व्हिडिओ 23 जुलैला रात्री उशिरा शेअर केला. यानंतर दुसरा व्हिडिओ लगेचच 24 तासांच्या आत शेअर केला. तिसरा व्हिडिओ 31 जुलै रात्री शेअर केला आहे.

Modi Gen Z Video
Amol Khatal : 'भावी मुख्यमंत्र्यांना पुन्हा स्वप्न पडायला लागली'; अमोल खताळांचा थोरातांवर नाव न घेता घणाघात

पहिल्या व्हिडिओत 23 जुलैला Gen-Zशी संवाद साधताना नीट परीक्षा पेपरफुटीप्रकरणावर, विद्यार्थ्यांच्या चिंता आणि कठोर कारवाईबाबत संदेश दिला होता. पहिल्या व्हिडिओला रेकाॅर्ड ब्रेक प्रतिसाद मिळाला. या व्हिडिओला 30 कोटी 3 लाखपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले.

Modi Gen Z Video
Student Protest : 'आंदोलक विद्यार्थ्यांना अडवून धमकावले'; हिंदुत्ववादी गुंडाचा कथित व्हिडिओ व्हायरल, 'कॉक्रोच'कडून भाजपला 2029चा इशारा

या पहिल्या व्हिडिओला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल "Thank You Friends" म्हणत विद्यार्थ्यांशी संवाद सुरू ठेवण्याचे आश्वासन देणारे दुसरा व्हिडिओ शेअर केला. तिसऱ्या व्हिडिओत जंतर-मंतरवरील आंदोलनादरम्यान झालेल्या आक्षेपार्ह घोषणांच्या पार्श्वभूमीवर "शिवीगाळीतून कोणतेही समाधान निघत नाही", असे सांगत संयम, संवाद आणि युवकांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले.

राऊतांकडून भाजप लक्ष्य

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विरोधकांकडून त्यांच्यावर मंत्रालयात कमी उपस्थिती आणि फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधण्यावरून 'फेसबुक मुख्यमंत्री' अशी टीका केली जात होती. आता पंतप्रधान मोदी इन्स्टाग्रामवरून वारंवार संवाद साधत असल्याच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी त्याच टीकेचा दाखला देत भाजपला लक्ष्य केले आहे.

"कालाय तस्मै नमः"

राऊत यांच्या मते, पूर्वी सोशल मीडियावरून संवाद साधणाऱ्या नेतृत्वावर टीका करणारेच आता त्याच माध्यमाचा प्रभावी वापर करत आहेत. त्यामुळे त्यांनी "कालाय तस्मै नमः" असे म्हणत भाजपवर उपरोधिक प्रहार केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com