Amit Shah Maharashtra Visit:
Amit Shah Maharashtra Visit: Sarkarnama
पुणे

Amit Shah Maharashtra Visit: अमित शाहांच्या महाराष्ट्र दौऱ्याने चर्चांना उधाण; खरचं एकनाथ शिंदेंची खुर्ची धोक्यात आहे का?

सरकारनामा ब्युरो

Amit Shah Maharashtra Visit : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) 27 एप्रिलला पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. अशात महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात घडलेला प्रकार आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चांमुळे राजकारण ढवळून निघालं होतं.या सर्व गोष्टींच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Amit Shah's visit to Maharashtra sparks discussions; Is Eknath Shinde's chair really in danger?)

अमित शहा 27 एप्रिल रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दोन आठवड्यांपूर्वी मुंबई दौऱ्यावर आलेल्या अमित शहांचा एप्रिल महिन्यांतील हा दुसरा महाराष्ट्र दौरा आहे. यावेळी त्यांच्या दोन दिवसीय नागपूर दौरा असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हेसुद्धा रात्री नागपूरमध्ये अमित शहा यांच्या भेटीसाठी येणार आहेत.

गेल्या आठवड्यात अजित पवार यांच्या भाजपसोबत जाण्याच्या चर्चां सुरु झाल्या राज्यात पुन्हा एकदा सत्तांतर होईल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन दिवसांपुर्वी, “आमची महाआघाडी आहेच. एकत्र काम करण्याची इच्छाही आहे. पण इच्छा असणं पुरेसं नसतं.” असं विधान केलं होत. या चर्चांमुळे राजकारण ढवळून निघालं होतं. (Maharashtra politics)

त्यानंतर मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आता काही दिवसांचे पाहुणे असल्याची चर्चा सुरू झाली आहे. लवकरच एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाणार, असा दावा उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला होता. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून विविध अंदाज बांधले जात आहेत. राऊतांपासून ते छगन भुजबळ, नाना पटोले यांच्यापर्यंत शिंदे यांच्याबाबत वेगवेगळे अंदाज बांधत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर कोण राहणार आणि कोण जाणार यावर सर्व काही अवलंबून असेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT