Vaijnath Waghmare Resign : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचे विभक्त पती वैजनाथ वाघमारेंची शिवसेनेला सोडचिठ्ठी..

Shinde Group Spokeperson Vaijnath Waghmare Resign : "सुषमा अंधारेंना इतिहासाची पुस्तकं कुणी दिली? हा खरा प्रश्न आहे,"
 Vaijnath Waghmare Risigns news
Vaijnath Waghmare Risigns news Sarkarnama

Shivsena Shinde Group Spokeperson Vaijnath Waghmare Resign: ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare )यांचे विभक्त पती अँड. वैजनाथ वाघमारे यांनी शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला आहे.

काही दिवसापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. शिवसेनेचे पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. सुषमा अंधारेंच्या आक्रमक भाषणांचा झंझावात सुरू असताना, दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या गटानं वैजनाथ वाघमारे यांना काही दिवसापूवी पक्षात घेतलं होतं.

शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर वाघमारे यांनी सुषमा अंधारेंवर गंभीर आरोप केले होते.शिवसेना पक्षाकडून पक्षबांधणीत कुठचीच महत्त्वाची जबाबदारी दिली जात नसल्याने वैजनाथ वाघमारे नाराज होते. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

पक्षप्रवेशाच्या वेळी वाघमारे यांनी सुषमा अंधारेंच्या विरोधात निवडणूक लढणार असल्याचे म्हटलं होते. "पक्ष जो आदेश देईल तो मला मान्य असेल. उद्या पक्षाने सांगितलं निवडणूक लढा, तर सुषमा अंधारे असू दे किंवा इतर कोणीही मी निवडणूक लढेन," असे वाघमारे म्हणाले होते.

 Vaijnath Waghmare Risigns news
WFI President Brij Bhushan Singh: भाजप खासदार, WFI चे अध्यक्ष ब्रिजभूषण यांच्या विरोधात सात कुस्तीपटुंची न्यायालयात धाव

शिवसेना प्रवेशानंतर वाघमारे म्हणाले होते की , आम्ही (सुषमा अंधारे) पंधरा वर्ष सोबत काम केले. त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. त्यांनी पक्षप्रवेश करु नये, असं मला वाटत होतं. त्यांचा हा निर्णय मला पटला नाही. त्यामुळे आम्ही विभक्त झालो. "सुषमा अंधारेंना इतिहासाची पुस्तकं कुणी दिली? हा खरा प्रश्न आहे," असेही ते म्हणाले होते.

 Vaijnath Waghmare Risigns news
YSRTP च्या प्रमुख वायएस शर्मिलांनी पोलिसाच्या श्रीमुखात लगावली ; Video व्हायरल

"एखाद्या महिलेच्या राजकीय मुद्द्यांवर टीका करण्याऐवजी तिच्या वैयक्तिक गोष्टींवर भाष्य केले जात आहे," अशा प्रतिक्रिया तेव्हा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी केली होती. मूळचे बीड जिल्ह्यातील असलेले वैजनाथ वाघमारे हे राजकीय क्षेत्रात कार्यरत नव्हते, ते सामाजिक कार्यात सक्रिय होते.

एकनाथ शिंदेंच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षातूनच त्यांनी राजकीय कारकीर्दीस सुरुवात केली होती. वैजनाथ वाघमारे यांचा राजीनामा अद्याप मंजूर करण्यात आलेला नाही. वाघमारे यांची समजूत काढण्याचा प्रयत्न पक्ष सचिवांकडून केला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com