Amit Shah Sarkarnama
पुणे

Amit Shah on Vision of Co-operation : अमित शहांनी सांगितलं सहकार खात्याचं व्हिजन ; बँकांना मोठे अधिकार.

Amit Shah News Update : कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार..

सरकारनामा ब्यूरो

Pune : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज (रविवारी) सहकार खात्यांचे व्हिजन स्पष्ट केलं. "महाराष्ट्रातील प्रत्येक साखर कारखान्यात इथेनॉलची निर्मिती व्हायलाच हवी. याबाबत राज्य सरकारने पावलं उचलावीत,अशा सूचना मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुखमंत्र्यांनी आज सकाळच्या बैठकीत दिल्या आहेत," असे शहा म्हणाले. केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS)कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन शहा यांच्या हस्ते चिंचवड येथे झाले. त्यावेळी शहा बोलत होते.

नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही..

अमित शहा म्हणाले, "सहकार क्षेत्राशी संबंधित कारभार पारदर्शक होईल. गेल्या काही महिन्यापासून सहकार क्षेत्राबाबत अनेक निर्णय घेतले आहे. या निर्णयांमुळे शेतकऱ्यांच्या मोठ्या समस्या सुटल्या आहेत. यापुढे कोणाच्याही नातेवाईकाला नोकरी मिळणार नाही तर फक्त कौशल्य असलेल्या व्यक्तीलाच नोकरी मिळणार आहे. सहकारी बँकांना मोठे अधिकार दिले आहेत,"

डेटा बनवण्याचं 95 टक्के काम पूर्ण

"आता तुम्हाला तुमच्या गावात, जिल्ह्यात किंवा राज्यातील सहकार क्षेत्राशी संबंधित सगळी माहिती उपलब्ध होणार आहे.त्यासाठी सहकार क्षेत्राचा मोठा डेटा आम्ही तयार करीत आहोत. हा डेटा बनवण्याचं 95 टक्के काम पूर्ण झालं आहे. या डेटामुळे प्रत्येक वरिष्ठांना आपल्या गावाची संपूर्ण माहिती लगेच मिळेल. त्यानुसार उपाययोजना करता येईल," अशी माहिती त्यांनी दिली.

जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ..

"देशातील सहकारी संस्थांच्या तुलनेत एकट्या महाराष्ट्राचा वाटा हा 42 टक्के आहे. महाराष्ट्राचं हेच योगदान दाखवण्यासाठी मी इथं सर्वांना घेऊन आलो आहे. आतापर्यंत 10 हजार कोटींची घोषणा केली मात्र जेवढे पैसे हवेत तेवढे देऊ," असे शहा म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT