Amit Shah on Ajit Pawar : अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात ; शहा यांचे मोठे विधान

Maharashtra Politics : , या ठिकाणी येण्यास तुम्ही उशिर केला,
amit-Shah-Ajit-Pawar
amit-Shah-Ajit-PawarSarkarnama
Published on
Updated on

Pune : अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर पहिल्यांदाच गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी अमित शहा यांनी अजितदादांबाबत मोठे विधान केलं. "अजितदादा, बऱ्याच काळानंतर तुम्ही योग्य जागी बसलात, या ठिकाणी येण्यास तुम्ही उशिर केला, असे शहा म्हणाले.

केंद्रीय सहकार संस्था निबंधक (CRCS)कार्यालयाच्या डिजिटल पोर्टलचे उदघाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते चिंचवड येथे झाले. त्यावेळी शहा बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित होते.

महिनाभरापूर्वी अजित पवार हे शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले, त्यानंतर अमित शहा यांच्यासोबत अनेकवेळा अजितदादांची भेट झाली, पण सार्वजनिक कार्यक्रमात हे दोन्ही नेते पहिल्यांदात रविवारी एकाच व्यासपीठावर होते.

शहा म्हणाले, "अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही पहिल्यादांच एका व्यासपीठावर आहोत. मी अजितदादांना सांगू इच्छितो की हीच जागा आपल्यासाठी योग्य होती, पण बसण्यासाठी तुम्ही उशीर केला. दादा मोठ्या कालावधीनंतर तुम्ही योग्य ठिकाणी बसला आहात," शहा यांच्या विधानानंतर अजितदादांनी स्मित हास्य केलं .

amit-Shah-Ajit-Pawar
Eknath Shinde ON Amit Shah : सहकार क्षेत्रासाठी शाहचं नेतृत्व म्हणजे वरदान ; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

"शहा यांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र दिला. सहकार क्षेत्रासाठी शहाचं नेतृत्व म्हणजे वरदान आहे, " असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

"अमित शहा यांनी एकदा निर्णय घेतला की ते थांबत नाहीत. त्यांनी या क्षेत्रात अनेक आमुलाग्र बदल केले आहेत. सहकारमंत्री झाल्यानंतर शहा यांनी अनेक क्रांतीक्रारी निर्णय घेतले. त्यांच्यामुळे सहकार क्षेत्राला नवी उर्जा मिळाली आहे. ते देशहिताचा निर्णय घेतात. त्यांच्या चेहऱ्यावर कधीही नाराजी मी पाहिली नाही.शहांना मी कधीही थकलेले पाहिले नाही. ते नेहमीच उत्साही असतात. त्यांची भूमिका नेहमीच मदतीची असते," असे मुख्यमंत्री म्हणाले.

amit-Shah-Ajit-Pawar
Amit Shah visits Pune : चिंचवडच्या कार्यक्रमानंतर शहा दिल्लीला रवाना होणार ; पुण्यातील कार्यक्रम रद्द

"सहकार क्षेत्रात हुकुमशाही प्रवृत्तीमुळे होते. शहा यांनी ही प्रवृत्ती मोडून काढली. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. राज्यातील साखर उद्योगाला केंद्राने मोठी मदत केली आहे. त्यांनी ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत केली. सहकार क्षेत्राचा कर माफ करून त्यांना या क्षेत्राला नवसंजीवनी दिली, " असे मुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले.

Edited By : Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com