Pune Ganeshotsav news : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे गणेशोत्सवाच्या निमित्ताने शनिवार आणि रविवार असे दोन दिवस पुण्यात होते. दोन दिवसांत त्यांनी विविध गणेश मंडळांना भेटी दिल्या. गणेशोत्सवाची परंपरा, पुणेकरांचा उत्साह अनुभवला. याचदरम्यान त्यांना अस्वस्थ करणारा एक व्हिडिओही समोर आला आहे.
अमित ठाकरे यांनी सोमवारी सोशल मीडियात २० सेंकदाचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगा अंगाला सिल्वर रंग लावून महात्मा गांधी यांच्या वेशभूषेत दिसत आहे. हा मुलगा ही वेशभूषा करून पैसे मागत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसते.
मुलाचा हा व्हिडिओ पोस्ट करत अमित ठाकरेंनी म्हटले आहे की, गणेशोत्सव सुरू आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे. पण या सगळ्यात रस्त्यावर एक गोष्ट पाहायला मिळते आहे. लहान मुलांच्या अंगाला सिल्वर केमिकलचे रंग लावून त्यांना देव किंवा महापुरुषांच्या रुपात उभं केलं जात आहे आणि त्यांच्याकडून भीक मागून घेतली जात आहे. हे अतिशय भीषण आहे.
ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांसह नागरिकांनाही याबाबत आवाहन केले आहे. माझं सर्व महाराष्ट्र सैनिकांना आणि नागरिकांना आवाहन आहे, ती लहान मुलं आहेत, निष्पाप आहेत. त्यामुळे आसपास असं काहीही दिसलं, तर ते तिथल्या तिथे थांबवा, असे आवाहन ठाकरेंनी केलं आहे.
मुलांच्या कुटुंबाला जी काही मदत हवी असेल ती आपण आपल्या परीने करू. मी स्वतःसुद्धा त्यांच्या पाठीशी उभा राहीन. पण लहान मुलांचं असं शोषण अजिबात होऊ देऊ नका. हे चित्र आपल्याला बदलायचंच आहे. जिथे असं दिसेल, तिथे ही गोष्ट त्वरित थांबवा, असे अमित ठाकरे यांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.