Amol Balwadkar at Jijai Bungalow, Pune, amid reports of joining Ajit Pawar-led NCP after being denied a BJP ticket for the upcoming Pune municipal elections. Sarkarnama
पुणे

Pune BJP news : चंद्रकांत पाटलांना नडलेल्या बालवडकरांना भाजपने उमेदवारी नाकारली : अखेरच्याक्षणी अजितदादांकडून उतरणार रिंगणात

Amol Balwadkar : पुणे महापालिका निवडणुकीत भाजपने अमोल बालवडकर यांची उमेदवारी नाकारली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादीतमधून मैदानात उतरणार आहेत, यामुळे शहरातील राजकारण तापले आहे आगामी स्थानिक निवडणूक राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत

Sudesh Mitkar

Pune News : पुणे महापालिका निवडणुकीसाठी भाजपने जवळपास सर्व उमेदवार निश्चित केले आहेत. उमेदवार यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप भाजपकडून करण्यात आले आहे. हे वाटप करताना भाजपने अनेक दिग्गजांचे पत्ते कट केले असल्याचे पाहायला मिळत आहेत. 30 ते 35 माजी नगरसेवकांना यंदा भाजपने तिकीट नाकारला आहे त्या ऐवजी तरुण उमेदवार मैदानात उतरवले आहेत.

उमेदवारी कट झालेल्या भाजपच्या नेत्यांमध्ये बाणेर - बालेवाडी मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या अमोल बालवडकर यांचा देखील समावेश आहे. अमोल बालवडकर हे विधानसभा निवडणुकीसाठी देखील कोथरूड मधून इच्छुक होते. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले होते. पक्षाने उमेदवारी न दिल्यास थेट अपक्ष निवडणूक लढण्याच्या तयारीत होते.

मात्र ऐनवेळी त्यांची समजूत काढण्यात पक्षाला यश आलं होतं आणि त्यानंतर चंद्रकांत पाटील आणि अमोल बालवडकर यांची समेट घडून आणण्यात आली होती. मात्र त्यानंतर आता अमोल बालवडकर यांचा उमेदवारीचा पत्ता कट केला असल्याचं समोर आला आहे.

आपल्याला उमेदवारी मिळणार नाही याबाबत स्पष्टता आल्यानंतर अमोल बालवडकर यांनी आज थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जिजाई बंगला गाठला आहे. जिजाई बंगला मध्ये येत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून ते निवडणूक लढणार असल्याचे देखील सांगितले जात आहे. पाटील यांना नडल्यामुळेच बालवडकर यांचा पत्ता कट करण्यात आला असल्याचा देखील चर्चा सध्या राजकीय वर्तुळामध्ये सुरू आहे.

याबाबत बोलताना अमोल बालवडकर म्हणाले, विधानसभेला देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिल्याने माघार घेतली. एक लाखाच्या मताधिक्याने चंद्रकांत पाटलांना निवडून आणलं त्यानंतर भाजपाने माझ्यासोबत दगा फटका केला. मला दोन दिवस अगोदर जरी सांगितलं असतं तरी मी ऐकलं असतं मात्र ऐनवेळी मला उमेदवारी नाकारली मी दादांच्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला होता. तो शब्द पाळला गेला नाही. यामध्ये भाजप पक्षाचे नुकसान आहे माझं नाही. असं बालवडकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT