Shirur Lok Sabha Election Sarkarnama
पुणे

Shirur Lok Sabha Constituency : 'कोल्हे म्हणजे केवळ राऊंड मारणारे खासदार तर मी...' ; आढळराव पाटलांचा टोला!

Shivajirao Adhalrao Patil Vs Amol Kolhe : या मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा संकल्प उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी केला.

Chaitanya Machale

Loksabha Election 2024 : निवडणूक जाहीर झाल्याच्या पहिल्या दिवसापासून चर्चेत राहिलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघात मतदानाच्या दिवशी गंभीर प्रकार घडला. या मतदारसंघातील हडपसर विधानसभा भागातील एका मतदान केंद्रात पोलिंग एजंट चक्क मतदान केंद्राच्या आत प्रचार साहित्य घेऊन बसल्याने गोंधळ उडाला.

या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार(Sharad Pawar) पक्षाचे खासदार अमोल कोल्हे निवडणूक लढवत आहेत. तर त्यांच्याविरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना महायुतीने उमेदवारी दिली आहे. मतदानाच्या दिवशी आढळराव पाटील यांचा पोलिंग एजंट मतदान केंद्राच्या आत प्रचार साहित्य घेऊन बसला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच तो मतदानासाठी आलेला नागरिकांना खानाखुणा करत असल्याचे समोर आले होते. याची तक्रार अमोल कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली होती त्यावर आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिले आहे.

अमोल कोल्हे(Amol Kolhe) यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीवर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, विरोधी पक्षाचे उमेदवार डॉ. कोल्हे हे आयोगाकडे करत असलेल्या किरकोळ तक्रारी म्हणजे निव्वळ रडगाणं आहे. मी मतदारसंघातील ग्राऊंडवरचा माणूस आहे, ते फक्त राऊंड मारायला येणारे खासदार आहेत, असा टोला त्यांनी कोल्हे यांना लगावला.

शिरूरमध्ये सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी काही प्रमाणात कमी नोंदवली गेली. मात्र असे असले तरी मतदान पूर्ण होईपर्यंत मतदानाचा टक्का वाढेल. या निवडणुकीत आपला विजय निश्चित असून मतदारांनी हे ठरविले असल्याचेही आढळराव पाटील म्हणाले. या मतदारसंघातून खासदार अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार असा संकल्प उपमुख्यमंत्री आणि महायुतीचे नेते अजित पवार यांनी केला. त्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत त्यांनी आढळराव पाटील यांच्यासाठी शिरूरमध्ये 20 पेक्षा अधिक सभा देखील घेतल्या आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT