Lok Sabha Election 2024 : पुण्यात काँग्रेसची मदार असलेल्या मतदारसंघात मतदानाचा आकडा कमी, फटका बसणार?

Lok Sabha Election 2024 : पुण्यात मतदार यादीमध्ये नाव नसणे आणि बोगस मतदान होणे, यामुळे या मतदान प्रक्रियेला कुठेतरी गालबोट लागल्याचे पाहायला मिळालं.
ravindra dhangekar
ravindra dhangekarsarkarnama

Pune News, 13 May : पुणे लोकसभेसाठी ( Pune Lok Sabha Constituency ) तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. त्यापार्श्वभूमीवर सकाळपासून मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडले आहेत. सकाळच्या सत्रात सर्वच मतदार केंद्रांवर रांगा पाहायला मिळाल्या. मतदानाचा सर्वाधिक उत्साह हा कोथरूड ( Kothrud), कसबा ( Kasaba ) आणि पर्वती ( Parvati ) मतदारसंघांमध्ये पाहायला मिळाला. त्यामुळे दुपारी एकपर्यंत या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं पाहायला मिळालं. तर, दुसरीकडे वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये मतांची टक्केवारी काहीशी कमी झाल्याचे पाहायला मिळालं. या मतदारसंघांवर विशेष करून काँग्रेसची मदार असल्याचं बोललं जात आहे.

पुण्यात आज ( 13 मे ) मतदान होत असताना नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र, दुसरीकडे मतदार यादीमध्ये नाव नसणे आणि बोगस मतदान होणे, यामुळे या मतदान प्रक्रियेला कुठेतरी गालबोट लागल्याचे पाहायला मिळालं. या परिस्थितीमध्ये देखील दुपारी एकपर्यंत 26.48% मतदान झालेलं आहे. यामध्ये सर्वाधिक मतदान कसबा पेठ मतदारसंघातून झाला असून ते 31.10% इतका आहे. त्याखाली कोथरूड विधानसभा मतदारसंघातून 29.10% इतकं मतदान झाले आहे. कसबा पेठ मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar ) हे लोकसभेच्या रिंगणात आहेत. तर, दुसरीकडे कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ ( Murlidhar Mohol ) हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही उमेदवारांच्या होमपीचवरती मतदान जास्त झाल्याने याचा फायदा कोणाला होणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मात्र, दुसरीकडे पाहिलं तर या दोन्ही मतदारसंघाच्या खालोखाल ज्या ठिकाणी पैसे वाटप झाल्याचा आरोप काँग्रेसने केला. त्या पर्वती लोकसभा मतदारसंघात देखील 27.14% इतके मतदान झाले आहे. तिन्ही मतदारसंघांमध्ये भाजपला चांगल्या मताधिक्याची अपेक्षा आहे.

ravindra dhangekar
Pune Lok Sabha Election : गणेश बिडकर काढणार का महापालिकेच्या पराभवाचा वचपा ?

वडगाव शेरी, कॅन्टोन्मेंट आणि शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये मतदानाचा टक्का इतर मतदारसंघांच्या तुलनेत कमी आहे. वडगाव शेरी मध्ये 24.85, शिवाजीनगर मध्ये 23.26 तर कॅन्टोन्मेंट मतदारसंघात 23.21% इतके मतदान झाले आहे. या मतदारसंघातील मतदार हा मागील काही निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याचा पाहायला मिळाले आहे. त्यामुळे या मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीमध्ये देखील मोठे मताधिक्य काँग्रेसला मिळेल, अशी अपेक्षा काँग्रेसच्या नेत्यांना आहे. पण, या मतदारसंघातून मतदानाचा टक्का कमी असल्याने त्याचा फटका नेमका कुणाला बसणार हे 4 जूनला कळेल.


( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com