Junnar News : महाविकास आघाडीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या 'शेतकरी आक्रोश मोर्चा'ची सुरुवात बुधवारी झाली. शिवनेरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करुन ही यात्रा सुरु झाली आहे. संसदेतून निलंबित केल्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी 'शेतकरी आक्रोश मोर्चा' काढला आहे.
कांदा निर्यात बंदी तत्काळ उठवावी, कांदा (Onion) निर्यातीसाठी कायमस्वरूपी धोरण ठरवावे, खासगी व शासकीय असा भेद न करता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, बिबटप्रवण तालुक्यात शेतीसाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा व्हावा, पीक विमा कंपन्यांच्या मनमानीला आळा घालून तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी निश्चित स्वरूपाचे 'शैक्षणिक कर्ज ' धोरण लागू करावे अशा प्रमुख मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या मोर्चाला संबोधित करताना खासदार कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, श्रीमंतांचे २५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ होऊ शकतं तर शेतकऱ्यांचे कर्ज का नाही, हा प्रश्न आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही लढतो आहोत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार ने शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे. कांदा निर्यात बंदी उठवावी अशी साधी मागणी आमची आहे. ही यात्रा सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसंदर्भात आहे, तिला कोणी रोखू शकणार नाही, असा हल्लाबोल त्यांनी केला.
कोल्हे म्हणाले, या यात्रेवर जे कोणी भाष्य करतील किंवा टीका करेल त्या सर्वांना माझी हात जोडून एक विनंती आहे. 'तुम्ही सर्व मोठे आहात पण तुमचा हा मोठेपणा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले तर दिसेल, नाहीतर या शेतकऱ्यांचा आवाज तुमच्या कानठळ्या बसवल्याशिवाय राहणार नाही', अशा शब्दात खासदार कोल्हे यांनी अप्रत्यक्षपणे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
(Edited By - Chaitanya Machale)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.