Onion Issue : 'इथेनॉलनिर्मितीच्या परवानगीत त्रुटी; कांदा निर्यातबंदीबाबत शाहांसोबत सोमवारी बैठक'

Dilip Walse Patil Statement : निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. निर्यातबंदीबाबत केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत येत्या सोमवारी बैठक होणार आहे.
Dilip Walse Patil
Dilip Walse Patil Sarkarnama

Pune News : केंद्र सरकारने उसापासून इथेनॉल निर्मितीवरील बंदी शुक्रवारी मागे घेतली. इथेनॉल निर्मितीस परवानगी देताना केंद्राकडून घेण्यात आलेल्या निर्णयात काही त्रुटी आहेत. त्यासंदर्भात तसेच कांदा निर्यातीवरील बंदी आणि इतर प्रश्नांबाबत मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मी सोमवारी (ता. १८ डिसेंबर) केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेटणार घेणार आहोत, अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. (Certain errors in permit for ethanol production; Meeting with Shah on onion issue: walse Patil)

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील माध्यमांशी बोलत होते. त्या वेळी त्यांनी इथेनॉल निर्मितीसंदर्भात केंद्र सरकाने घेतलेल्या निर्णयाबाबत भाष्य केले. ते म्हणाले की, देशात यावर्षी साखर उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. साखर उत्पादनात वाढ होण्यासाठी कारखान्यांना इथेनॉलनिर्मिती करण्यासाठी केंद्र सकारने बंदी घातली होती. या निर्णयाला देशातील साखर कारखान्यांकडून कडाडून विरोध झाला होता. त्याचे तीव्र पडसाद राज्यात उमटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dilip Walse Patil
Assembly Winter Session : कर्नाटक सरकारचा शेतकरीहिताचा निर्णय; महाराष्ट्रातील बळिराजाचे अधिवेशनाकडे डोळे

देशातील शुगर लॉबीकडून विशेषतः इथेनॉलनिर्मिती कारखान्याकडून केंद्र सरकारच्या निर्णयाला विरोध करण्यात आला होता. इथेनॉल निर्मितीसाठी झालेली गुंतवणूक आणि संभाव्य नुकसान लक्षात घेऊन सरकारने इथेनॉलनिर्मितीची बंदी मागे घेतली आहे. इथेनॉल निर्मितीस परवानी दिली असली तरी त्यात काही त्रुटी आहेत. त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, असेही वळसे पाटील यांनी स्पष्ट केले.

निर्यातबंदीमुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे निर्यातबंदीबाबत केंद्रीय सहकार मंत्री शाह यांच्यासोबत येत्या सोमवारी बैठक होणार आहे. त्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी नाफेड खरेदी व इतर काही मार्ग आहेत का, याची चाचपणी केली जणार आहे, असेही राज्याच्या सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केले.

Dilip Walse Patil
Fadnavis Thank's to Central Govt : देवेंद्र फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार... काय आहे कारण?

दरम्यान, केंद्र सरकारने उसापासून इथेनॉलनिर्मिती करण्यास परवानी देताना त्यात अट घातली आहे. इथेनॉल निर्मितीसाठी कारखान्यांना १७ लाख टनांपर्यंतचे साखर उत्पादन वापरता येणार आहे. म्हणजेच केंद्राने इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी देताना त्यातही मर्यादेचा खोडा घातला आहे.

Dilip Walse Patil
Onion Export Ban Issue : ‘शुगर लॉबी’पुढे सरकार झुकले; कांदा उत्पादक वाऱ्यावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com