Shirur Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar : Amol Kolhe Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Vs Amol Kolhe : 'नथूराम गोडसेचीही भूमिका केली होती, हेही सांगा', अमोल कोल्हेंना अजित पवारांचं आव्हान!

Shirur Lok Sabha Constituency : 'विश्वास ठेवा लोकसभेला काम करणार पण अविश्वास दाखविलात तर माझं नाव..' जाणून घ्या नेमकं कोण आणि कोणाला म्हणाले आहे.

उत्तम कुटे: सरकारनामा

Lok sabha Election 2024 महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रसेचा कार्यकर्ता मेळावा मंगळवारी मंचर (ता.आंबेगाव,जि.पुणे) येथे झाला. त्यात शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर तेच पक्षाचे शिरुरला लोकसभेचे उमेदवार असतील, असे अजित पवार यांनी जाहीर केले.यावेळी त्यांनी आढळरावांच्या प्रचाराचा नारळच फोडला.

अजितदादांनी या मेळाव्यातील आपल्या चाळीस मिनिटांच्या भाषणात आढळरावांचे प्रतिस्पर्धी उमेदवार आघाडीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर अपेक्षेप्रमाणे सडकून टीका केली. हा अमोल नाही, तर अनमोल मेळावा आहे,असे त्यांनी सुरुवातीसच सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजेंची भूमिका करीत त्यांचे कार्य घराघरात पोहचविले असा टेभा मिरविणाऱ्या कोल्हेंनी महात्मा गांधींचा मारेकरी नथूराम गोडसे याचीही भूमिका केली होती, हे ही सांगावे,असे आव्हान अजितदादांनी दिले. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावरून महायुतीत नवे वादळ येण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोल्हे आता डायलॉगबाजी करू लागले आहेत. पण ती नाटक, सिनेमात ठीक आहे, इथे निवडणूक असल्याने जनतेत ती चालणार नाही,असे अजितदादा म्हणाले.राजकारण हा आपला पिंड नसल्याने ते आपले काम नाही, असे सांगणारे आता निवडणुकीला का उभे राहिलेत,अशी विचारणा त्यांनी कोल्हेंनी केली.तसेच आढळरावांची ही घरवापसी आहे,तर तुमचे पक्षांतर झालेले आहे,असा टोला त्यांनी कोल्हेंना लगावला.

दिलीप मोहितेंचेही या मेळाव्यात त्यांच्या स्वभावानुसार आक्रमक आणि सडेतोड भाषण झाले. त्यांनी आढळरावांबरोबरचे 20 वर्षाचै वैर यावेळी जाहीरपणे मिटवले. पण, ते करताना सज्जड इशारा सुद्धा दिला. विश्वास ठेवा लोकसभेला काम करणार पण अविश्वास दाखविलात तर माझं नाव दिलीप मोहिते आहे हेही लक्षात ठेवा, हे निक्षून सांगण्यास ते विसरले नाहीत. अजितदादांप्रमाणे तुम्ही मागे उभे रहा, गटतटाचे राजकारण करू नकाअशी विनंती त्यांनी आढळरावांना केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT