Pune Political News : शिरूर लोकसभा मतदारसंघात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी Ajit Pawar खासदार अमोल कोल्हेंना पराभूत करण्याचा चंग बांधला आहे. त्यासाठी त्यांनी शिवसेना शिंदे गटातील नेते माजी खासदार शिवाजीराव आढळरावांना आपल्या पक्षात घेतले. अजितदादा आणि आढळरावांनी एकत्रितपणे खासदार कोल्हेंना खिंडीत पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ने शिरूर लोकसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच तापले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित गुरुवारी ता. २५ आढळराव पाटील Shivajirao Adhalrao Patil यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावर निशाणा साधत अमोल कोल्हेंनी आढळराव पाटलांची खिल्ली उडवली. ते म्हणाले, आज विरोधी पक्षाच्या उमेदवाराचा अर्ज भरला गेला. पण उमेदवारी अर्ज भरायला मुख्यमंत्री आलेच नाहीत. मी डमी उमेदवार म्हणतो ते उगाच नाही, असा टोला लगावत खासदार कोल्हेंनी आढळराव पाटलांवर पुन्हा निशाणा साधला आहे.
भोसरीत महाविकास आघाडीच्या कार्यकर्ता मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shinde यांनी शिरूमधून शिवाजी आढळराव पाटील यांना नव्हे तर, छगन भुजबळांना Chhagan Bhujbal उमेदवारी देण्याचा प्लॅन होता, असा गौप्यस्फोट महाविकास आघाडीचे उमेदवार कोल्हे यांनी केला. त्यानंतर गुरुवारी आढळराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गैरहजर राहिले. त्यावरून कोल्हे यांनी डमी उमेदवार म्हणत आढळराव पाटलांवर निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
कोल्हे Amol Kolhe म्हणाले, आढळराव पाटलांचा अर्ज भरताना मुख्यमंत्री आलेच नाहीत. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे, मी काय सभा घेणार नाही. मी फक्त रोड शो करून निघून जाईल, असे नागपूरकरांनी सांगितले. यावरूनच स्पष्ट होत आढळराव पाटील हे डमी उमेदवार आहेत. त्यामुळे शिरूरमधील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. कोल्हेंच्या टीकेला आढळराव पाटील काय उत्तर देणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.
(Edited by Sunil Dhumal)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.