Supriya Sule, Shrirang Barne
Supriya Sule, Shrirang Barne Sarkarnama
पुणे

Top Ten MPs In India: देशातील 'टॉप-टेन' खासदारांमध्ये सुप्रिया सुळे प्रथम, तर श्रीरंग बारणे दुसऱ्या स्थानी

सरकारनामा ब्युरो

Popular MPs In India: सतराव्या लोकसभेत आतापर्यंतच्या कामगिरीनुसार बारामतीच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) पहिल्या नंबरवर आहेत. तर, त्यानंतर दुसरा क्रमांक मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पटकावला आहे.

देशातील 'टॉप-टेन' खासदारांमध्ये महाराष्ट्राची बाजी मारली असून चार खासदार झळकले आहेत. त्यात शिवसेनेचे तीन, एक राष्ट्रवादीचा आहे. तर, तमिळनाडूतील दोन (सेंथीलकुमार एस आणि धनुष एम. कुमार), राज्यस्थान (पी. पी. चौधरी), उत्तरप्रदेश (पुष्पेंद्रसिंह चंदेल), कुलदीप राय शर्मा (अंदमान आणि निकोबार), झारखंड (विद्युत बरन महतो) येथील एकेक खासदार या यादीत आहेत.

सुप्रिया सुळे आणि बारणे यांच्याखेरीज महाराष्ट्रातील शिवसेनेचे मुंबईतील राहूल शेवाळे (नवव्या)आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याणचे डॉ.श्रीकांत शिंदे (आठव्या) हे इतर दोन खासदार 'टॉप-टेन'मध्ये आहेत.भाजप, शिवसेनेचे प्रत्येकी तीन, डीएमकेचे दोन आणि काँगेस आणि राष्ट्रवादीचा एकेक खासदार या यादीत आहे.

लोकसभेच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे 'गेट वे पॉलिटिकल स्टॅटेजिक' संस्थेमार्फत सतराव्या लोकसभेच्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील पहिल्या सत्रापर्यंतच्या देशातील खासदारांच्या कामगिरीचे विश्‍लेषण करण्यात आले, त्यानुसार कामकाजात सक्रिय सहभागी होणा-या 'टॉप-टेन'खासदारांची यादी बनविण्यात आली. १४८ वेळा चर्चेत सहभाग घेत खासदार श्रीरंग बारणे (Shrirang Barne) यांनी ५०८ प्रश्न विचारले आहेत. दहा टक्के खासगी विधेयकेही मांडली आहेत. सभागृहात त्यांची उपस्थिती ९४ टक्के आहे.

गत सोळाव्या लोकसभेच्या कामकाजातही ते अग्रभागी होते. त्यातूनच त्यांना सलग सातवेळा संसदरत्न, महासंसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. यामुळे आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा मिळाली. यापुढेही मावळच्या जनतेची अशीच सेवा करत राहील, अशी प्रतिक्रिया खासदार बारणेंनी संसदेतील दुसऱ्या क्रमांकाच्या कामगिरीवर दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT