Amrut Parhad Passed Away Sarkarnama
पुणे

Amrut Parhad : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमृत पऱ्हाड यांचे निधन

Amrut Parhad Passed Away : पक्षासाठीच्या योगदानाबद्दल ‘अटल कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते

उत्तम कुटे: सरकारनामा

Pimpari-Chinchwad BJP News : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते अमृत सोमाजी पऱ्हाड (वय ६५,रा.भोसरी) यांचे सोमवारी (ता.११) अल्पशा आजाराने निधन झाले. ते भाजपचे स्थापनेपासूनचे कार्यकर्ते होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

पऱ्हाड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात 'भाजयुमो'चे पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून केली‌ आणि नंतर ते सलग चारवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यानंतर पुढे ते महापालिकेचे विरोधी पक्षनेतेही झाले.

पक्षासाठीच्या योगदानाबद्दल त्यांना ‘अटल कार्यकर्ता’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी राम जन्मभूमी आंदोलनात सहभाग घेतला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

खरंतर अयोध्येत 1992 मध्ये बाबरी मशिदीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले, म्हणून ज्यांना त्याच दिवशी रामजन्मभूमीवर श्रध्दांजली अर्पण करण्यात आली होती. ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींवर(LK Advani) जे गुन्हे दाखल आहेत, त्यात पऱ्हाडही सहआरोपी आहेत. "राम मंदिर पाहण्यासाठी मी अजूनही जिवंत आहे,' असे सांगून पऱ्हाड यांनी त्यांच्या न झालेल्या मृत्यू घटनेच्या आठवणी तीन वर्षांपूर्वी सरकारनामाशी बोलताना जागविल्या होत्या.

महाराष्ट्रातून 3 डिसेंबर 1992 रोजी कारसेवेसाठी अयोध्येला निघालेल्या हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्ये राज्यातील तत्कालीन विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde), विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अण्णा डांगे, प्रकाश जावडेकर, धरमचंद चोरडीया, ना. स. फरांदे, किरीट सोमय्या, जयसिंगराव गायकवाड, गिरीश बापट(Girish Bapat), विमल मुंदडा, जयश्री पलांडे आदींसोबत अमृत पऱ्हाड यांचाही समावेश होता.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT