Girish Bapat News : गिरीश बापट अनंतात विलीन; शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

Pune News : 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' घोषणा देत अभिवादन
funeral procession of Girish Bapat
funeral procession of Girish BapatSarkarnama

Pune News : खासदार गिरीश बापट (वय ७३) यांचे प्रदीर्घ आजारामुळे बुधवारी (ता. २९) निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या शनिवार पेठतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अंत्ययात्रेदरम्यान नागरिकांनी 'पुण्याची ताकद, गिरीश बापट' अशा घोषणा देत त्यांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी सातच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

पुण्याच्या राजकारणात Girish Bapat बापट ‘भाऊ’ म्हणून ओळखले जात होते. आजारी असल्याने त्यांच्यावर काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. दरम्यान, कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

funeral procession of Girish Bapat
Mahesh Landge On Girish Bapat's Demise : कुस्तीचे प्रशिक्षण घेत होतो तेव्हापासून...; आमदार लांडगेंनी सांगितल्या बापटांच्या आठवणी

गिरीश बापट यांचे शिक्षण

गिरीश बापट यांचा जन्म 3 सप्टेंबर 1950 रोजी पुण्यात झाला.

तळेगाव दाभाडे येथे प्राथमिक शिक्षण.

त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल रमणबागेत झाले.

बीएमसीसीत वाणिज्य शाखेची पदवी.

1973 मध्ये टेल्कोमध्ये कामगार म्हणून रुजू झाले.

नगरसेवक ते खासदार

बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक (RSS) आहेत. त्यानंतर ते जनसंघातून राजकारण आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ आणि परिवारातील संस्थांतील विविध पदांची जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पेलली.त्यांच्या आपली राजकीय जीवनाची सुरवात नगरसेवकपदापासून झाली. नगरसेवक-आमदार-खासदार अशा त्यांचा राजकीय प्रवास आहे.

funeral procession of Girish Bapat
Rahul Gandhi News : ज्या कोलरमधील वक्तव्याने राहुल गांधींची खासदारकी गेली; तिथूनच फोडणार कर्नाटक निवडणूक प्रचाराचा नारळ

सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष

पुणे महानगरपालिकेत (PMC) १९८३ मध्ये पहिल्याच प्रयत्नात बापट नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. याचा काळात आपल्या सर्वपक्षीय जनसंपर्काच्या जोरावर गिरीश बापट महापालिकेत पक्षाची सत्ता नसतानाही स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते.

"कुणी कितीही करा आदळआपट..,कसब्यात फक्त गिरीश बापट"

1995 मध्ये आमदारकीची निवडणूक लढविली अन्‌ पुढे सलग 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले.निवडणुक काळात कसबा पेठ परिसरात "कुणी कितीही करा आदळआपट..,कसब्यात फक्त गिरीश बापट" असे बॅनर लावलेले दिसायचे.

funeral procession of Girish Bapat
Devendra Fadnavis on Girish Bapat : मुख्यमंत्री असतांना भाऊंमुळे मी चिंतामुक्त होतो; फडणवीसांनी सांगितला तो किस्सा

मोहन जोशींचा पराभव करुन खासदार

1996 साली त्यांना भाजपाने पुण्यातून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली होती. यात त्यांचा पराभव झाला आणि काँग्रेसचे सुरेश कलमाडी खासदार झाले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र, पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांची संधी हुकली. परंतु, 2019 मध्ये योग्यपणे मोर्चेबांधणी करत त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळवले. त्यानंतर निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी (Mohan Joshi) यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com