Amruta Fadnavis News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी आणि गायिका अमृता फडणवीस यांच्याबाबत गायिका अंजली भारती यांनी अत्यंत वादग्रस्त आणि आक्षेपार्ह विधान केले आहे. यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आल्याचे पाहायला मिळतं आहे.
अंजली भारती यांनी एका कार्यक्रमादरम्यान बलात्कारासंदर्भात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अमृता फडणवीस यांच्याबाबत केलेल्या विधानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या प्रकरणाचा निषेध नोंदवला आहे.
याप्रकरणी बोलताना विधान परिषदेच्या नीलम गोऱ्हे म्हणल्या, संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांचीही जबाबदारी आहे की कार्यक्रमातील वक्तव्ये ही संविधानाच्या चौकटीत आणि सामाजिक भान राखून केली जातील. अमृता फडणवीस या सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला आहेतच; मात्र मुळातच कोणत्याही महिलेबद्दल दुसऱ्या महिलेने अशा प्रकारची भाषा वापरणे हे संविधानविरोधी असून मानवी अधिकारांचा भंग करणारे आहे. अशा वक्तव्यांमुळे महिलांवरील अपमान आणि हिंसेला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले जाते, ही बाब अधिक चिंताजनक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे बोलताना डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले की, बलात्काराच्या बदल्यात बलात्कार किंवा पुरुषांचे प्रायव्हेट पार्ट विच्छेदन करण्यासारखी वक्तव्ये समाजाला चुकीच्या दिशेने नेणारी आहेत. अशा भाषेचे समर्थन होणे म्हणजे हिंसाचाराची साखळी निर्माण करण्यास खतपाणी घालण्यासारखे आहे. सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीवर, विशेषतः महिलांवर, अशा प्रकारे आक्रमक आणि अमानवी भाषा वापरण्याचा कोणालाही अधिकार नाही, असे त्या म्हणाल्या. तसेच राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली असून संबंधित व्यक्तींना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे संकेत आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिले आहेत.
याबाबत रूपाली चाकणकर म्हणाल्या, “बलात्कारासारख्या घटनेचा निषेध करणे गरजेचे असताना ‘बलात्कार करा’ असे विधान करणे अत्यंत चुकीचे असून धक्कादायक आहे. समाज बलात्कारासारख्या गुन्ह्यांविरोधात लढत असताना असे विधान कोणी कसे करू शकते?” संबंधित व्हिडिओ मी अद्याप पूर्णपणे ऐकलेला नाही. मात्र व्हिडिओ ऐकून या विधानामागचा नेमका उद्देश काय होता, याची सखोल माहिती घेतली जाईल. अशा प्रकारचे विधान करणाऱ्यांना राज्य महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहे.”
दरम्यान गायिका अंजली भारती हिच्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. अनेकांनी या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत संबंधित व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे हे अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.