Amruta Fadnavis On Pune Hit And Run Case Sarkarnama
पुणे

Pune Accident News: पुणे 'हिट अँण्ड रन' प्रकरणावर अमृता फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाल्या, "आरोपीला जामीन..."

Jagdish Patil

Pune Hit And Run Case News: पुण्यातील 'हिट अँड रन' प्रकरणाची राज्यासह देशभरात चर्चा सुरु आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. तर फडणवीस यांनी या प्रकरणासंदर्भात थेट पत्रकार परिषद घेत अनेक खुलासे केले. यावेळी त्यांनी बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्न निर्माण करणारी असल्याचं म्हटलं होतं. अशातच आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील बाल हक्क न्यायालयाचा निर्णय लाजीरवाणा असल्याचं म्हटलं आहे.

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक ट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, पुण्यातील अपघातात (Pune Accident) मरण पावलेल्या अनिश अवधिया आणि आश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या सहवेदना आहेत. पण यातील प्रमुख आरोपीला कठोर शिक्षा व्हायला हवी. तसेच या प्रकरणात बाल न्याय मंडळानं (Juvenile Justice Board) आरोपील दिलेला जामीन हा लाजीरवाणा निकाल आहे, असं म्हणत त्यांनी निकालावर नाराजी व्यक्त केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बाल न्याय मंडळाची भूमिका प्रश्न निर्माण करणारी

काल पुण्यातील (Pune) पत्रकार परिषदेत बोलनाता फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "या प्रकरणात दुर्दैवाने बाल न्याय मंडळाने वेगळी भूमिका घेतली आणि प्रौढाप्रमाणे वागणूक देण्याचा जो मुद्दा आहे, तो केवळ दिसला आणि सापडला अशाप्रकारे बाजूला ठेवला आणि रिमांडच्या अर्जावर त्यांनी अतिशय सौम्यप्रकारची भूमिका घेत, पंधरा दिवस समाजसेवा करा, व्यसनापासून दूर करा अशाप्रकारच्या गोष्टी त्यात लिहिल्या. बाल न्याय मंडळाची भूमिका पोलिसांसाठी (Police) सुद्धा एक धक्का होता. शिवाय बाल न्याय मंडळाने जी काही भूमिका घेतली. ती नागरिकांच्या आणि शासनाच्याही मनात प्रश्न निर्माण करणारी आहे" असं फडणवीसांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT