Pune Hit and Run Case: पुण्यातील कल्याणीनगर येथील 'हिट अॅण्ड रन' प्रकरणात दिवसेंदिवस नवनवे खुलासे होत आहेत. अशातच आता आरोपी वेदांत अगरवाल (Vedant Agarwal) याच्यासंदर्भातील बाल हक्क कोर्टात सुरु असलेल्या सुनावणीमध्ये आणखी आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे वेदांत अगरवाल याचा ब्लड टेस्ट रिपोर्ट कोर्टपुढे सादर करण्यात आलेला नाही. त्यामुळे वेदांत अगरवाल याला पुन्हा जामीन मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यातील 'हिट अॅण्ड रन' प्रकरणावरुन राज्यासह देशातील वातावरण तापलं आहे. शिवाय आरोपीला अल्पवयीन न मानता त्याला प्रौढ जाहीर करावं अशी मागणी पुणे पोलिसांनी (Pune Police) बाल हक्क न्यायालाकडे केली आहे. न्यायालयाने जर आरोपी वेदांत अगरवाल याला प्रौढ घोषित केलं, तर पुणे पोलिसांकडून त्याला तातडीने अटक करण्यात येणार असल्याचं बोललं जात होतं.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
परंतु आरोपी वेदांत यांनी मध्यप्रशान केल्याचे रिपोर्ट कोर्टात सादर न केल्यामुळे आता त्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे. तसेच या प्रकरणाचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने (Child Rights Court) राखून ठेवला आहे. दोन्ही पक्षांमध्ये युक्तिवाद सुरू असून साधारणता चार वाजल्यानंतर कोर्टाचा निर्णय देण्याची शक्यता आहे. एकीकडे आरोपी अल्पवयीन मुलगा बाल हक्क कोर्टात तर वडील विशाल अगरवाल (Vishal Agarwal) याला पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल करण्यात आलं आहे.
तर देशभरात चर्चेत असणाऱ्या अपघात प्रकरणाची सुनावणी आज कोर्टात होणार असल्याचं माहिती असतानाही आरोपीचे ब्लड टेस्ट रिपोर्ट (Blood Test Report) कोर्टात का सादर केले गेले नाहीत? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच आरोपीच्या वडिलाचे अनेक बड्या राजकीय नेत्यांशी संबंध असल्यामुळे या केसमध्ये असा विलंब केला जात आहे का? अशाही चर्चांना उधाण आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.