Anand Dave, Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray : 'हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली'

Raj Thackeray|MNS|Anand Dave : राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आणि आमची भीती खरी ठरली, असे आनंद दवेंनी म्हटले आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज (ता.11 एप्रिल) माजी नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) यांनी भेट घेतली. राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरुन मोरेंनी नाराजी व्यक्त केली होती. याची दखल घेत राज ठाकरेंनी तातडीने मोरेंना भेटीसाठी मुंबईला पाचारण केले होते. या भेटीनंतर मोरेंनी 100 टक्के समाधान झाल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, त्यांच्या या भेटीवर हिंदुत्व हरले, मुस्लीम मतांची काळजी जिंकली, राज साहेब पुन्हा बदलले, अशी टीका ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी केली आहे.

माझे मतदार काम नाही धर्म पाहून मतदान करतात. त्या मतांची काळजी असल्याने भोंग्यासमोर आम्ही हनुमान चालीसा लावणार नसल्याचे सांगणारे वसंत मोरे हे पक्षातच राहणार, हे राज ठाकरेंनी आज स्पष्ट केले आहे. त्यामुळे हिंदुत्व हरले आणि मुस्लीम मतांची काळजी जिंकली आहे. राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भूमिका बदलली आणि आमची भीती खरी ठरली, असे दवेंनी म्हटले आहे. तर आता उद्याच्या सभेत दाखवला जाणारा आक्रमकपणा काय उपयोगाचा, असा सवालही उपस्थित करून राज यांच्यावर टीका केली तर हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज यांनी भूमिका बदलू नये, अशी अपेक्षाही दवेंकडून व्यक्त करण्यात आली आहे.

राज ठाकरेंनी पाडव्याच्या मनसेच्या मेळाव्यात भोंग्याच्या वक्तव्याचे दवेंनी समर्थन केले होते. त्यांनी मांडलेली भूमिका ही योग्यच आहे. मात्र, आता या भूमिकेवरून त्यांनी हटू नये, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. तसेच या मुद्द्यावरून दोन गेले तर वीस येतील, मात्र, राज यांनी आपली भूमिका बदलू नये. मोरे, बाबर यांच्यापेक्षा हिंदुत्व महत्त्वाचे असून हिंदुत्ववादी तुमच्याकडे आशेने पाहत आहे, असेही दवे म्हणाले होते.

दरम्यान, राज ठाकरेंच्या मशिदीवरील भोंग्याच्या भूमिकेवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. तर भाजपकडून राज यांच्या भूमिकेचे समर्थन केले होते. वसंत मोरेंनी ठाकरेंचा आदेश पाळणार नाही म्हटल्यावर त्यांची पुणे शहाराध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. यानंतर मोरे कुठल्या पक्षात प्रवेश करणार अशा चर्चा देखील रंगल्या होत्या मात्र, मोरेंनी मी मनसे आणि राज ठाकरेंसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. यानंतर उद्या ठाण्यात होणाऱ्या सभेच्या आधीच ठाकरेंनी मोरेंना मुंबईत बोलावत त्यांच्याशी चर्चा केली. या भेटीनंतर मोरेंनी या भेटीत आपले समाधान झाल्याचे म्हटले असून उद्याच्या सभेत आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळणार असल्याचे म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT