'पवारांच्या घरावर हल्ला झाला तेव्हा गृहखात झोपलं होत की झोपवलं होत?'

BJP|Anil Bonde|NCP|Shivsena|Mahavikas Aghadi: यशोमती ठाकूर जनतेच्या मनातले बोलल्या आहेत,असे भाजप नेते व माजी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
Anil Bonde
Anil BondeSarkarnama
Published on
Updated on

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे रविवारी (ता.11 एप्रिल) अमरावती दौऱ्यावर आले असता एका कार्यक्रमात बोलतांना जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yoshomati Thakur) यांनी पवार साहेब तुम्हीच या राज्याचे मुख्यमंत्री असता तर बरं झाले असते, असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याने राज्यात चांगलीच खळबळ उडाली असून भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया द्यायला सुरूवात केली असून महाविकास आघाडीवर टीका करण्यात येत आहे. दरम्यान यशोमती ठाकूर या जनतेच्या भाषा बोलल्या असल्याचे भाजप (BJP) नेते व माजी मंत्री डॉ अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी म्हटले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला डिवचले आहे.

Anil Bonde
सलग दुसऱ्या सोमवारी पोलिसांनी चौकशी केली अन् दरेकर म्हणाले, माझा छळवाद मांडलाय!

बोंडे म्हणाले, मुख्यमंत्र्यांची प्रशासनावर वचक नाही नसून मुख्यमंत्री पद यशस्वी रित्या सांभाळू शकत नाहीत. ते कधी दौरा करत नाही. घरात बसून ते केवळ राज्य सांभाळत आहेत. त्यांच्यामुळे संपूर्ण राज्यात बेबंदशाही, अराजकता माजली आहे. सध्या राज्याच रिमोट कंट्रोल हे ठाकरे यांच्याकडे नसून ते शरद पवारांकडे आहे. सगळं राज्य पवारच चालवीत आहेत त्यापेक्षा तुम्हीच मुख्यमंत्री झाला असता तर बरं झालं असतं. मात्र, यावेळी य़शोमती ठाकूर या जनतेच्या मनातलं बोलल्या, अशा शब्दात डॉ बोंडेंनी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीला टोला लगावला.

Anil Bonde
पोलीस अधिकाऱ्यांवरील कारवाईसाठी भाजपचे दरेकर आग्रही

शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी गृहखात झोपल होत का? की झोपवल होत? कदाचित झोपवलच असेल, असा सवाल बोंडे यांनी उपस्थित केला. तर कालच्या मेळाव्याच्या भाषणात या हल्ल्याशिवाय कुठला विषयच नव्हता. कारण या मुद्द्यावरून राज्यभरात सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न दिसत आहे. तसेच एसटीचे आंदोलन संपवण्यासाठी आणि अॅड. गुणरत्न सदावर्तेंना बळीचा बकरा बनवण्यासाठी हे सर्व करण्यात आले होते. मात्र, हे मुख्यमंत्र्यांना दुर्देवाने थांबवता आले नाही, अशी टीका डॉ बोंडेंनी केली आहे.

Anil Bonde
माजी पोलीस अधिकाऱ्याने केली सदावर्तेंची पोलखोल; गुणरत्न हा संघाने सोडलेला...

दरम्यान, यशोमती ठाकूर यांच्या या विधानाला शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शरद पवार युपीए चे अध्यक्ष झाले तर संपूर्ण देशाला त्याचा फायदा होईल, तुम्ही प्रस्ताव देणार का असा सवाल केला आहे. ट्विट करत नीलम गोऱ्हे यांनी यशोमती ठाकूर याना विचारले आहे. "आज @AdvYashomatiINC यांनी अमरावतीत विधान केले आहे की @PawarSpeaks मुख्यमंत्री असते तर वेगळे चित्र दिसले असते. मा.यशोमतीताई, मला तर असे वाटते की मा. पवार साहेबांना UPA चे अध्यक्ष करावे! त्यामुळे तर पुर्ण भारताला ऊपयोग होईल! देता प्रस्ताव ? असा प्रतिप्रश्न नीलम गोऱ्हे यांनी विचारला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com