Prakash Ambedkar Sarkarnama
पुणे

Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांवर शुक्रवारी अँजिओप्लास्टी; 'आयसीयू'मध्ये उपचार सुरू

Prakash Ambedkar Health Update: आंबेडकर यांच्या छातीत छोटी गाठ असून, शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे, असे पक्षातर्फे अधिकृत पत्रक काढून माहिती देण्यात आली. दरम्यान, वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे स्थान सोडून गर्दी करू नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

Pune News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असतानाच वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ॲड. प्रकाश आंबेडकर यांना अचानक अस्वस्थ वाटत असल्याने पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आंबेडकर यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांच्यावर 'आयसीयू'मध्ये उपचार सुरू असल्याची माहिती आहे.

गुरुवारी पहाटे छातीत दुखू लागल्याने आंबेडकर यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्या हृदयात रक्ताची गाठ झाल्यामुळे त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. आंबेडकर यांच्या छातीत छोटी गाठ असून, शुक्रवारी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी केली जाणार आहे, असे पक्षातर्फे अधिकृत पत्रक काढून माहिती देण्यात आली. दरम्यान, वंचितच्या कार्यकर्त्यांनी स्वतःचे स्थान सोडून गर्दी करू नये, असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आले आहे.

गुरुवारी पहाटे अचानक प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले, त्यांची ऑजिओग्राफी केली जाणार आहे. त्याचा अहवाल आल्यानंतर त्याची माहिती सर्वांना समाज माध्यमाच्या माध्यमातून दिली जाईल. त्यांची काळजी घेण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक आहे. कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या बाहेर काळजी करू नये, असे आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले

प्रकाश आंबेडकर यांना अस्वस्थ वाटत असल्याने रुग्णालयात दाखल केले, त्यांची ऑजिओग्राफी करण्यात आली आहे. उजव्या बाजूच्या धमणीमध्ये छोटी गाठ आढळून आली आहे. शुक्रवारी अँजिओप्लास्टी करून ही गाठ काढली जाणार आहे. प्रकृती स्थिर असून, दुपारी त्यांनी व्यवस्थित जेवण केले आहे, असे समाजमाध्यमावरून सांगण्यात आले.

दरम्यान, पुढील काही दिवस आंबेडकर हे डॉक्टरांच्या निरीक्षणात राहणार आहेत. या काळात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांच्या नेतृत्वात निवडणूक समन्वय समिती, जाहीरनामा समिती यासह अन्य पक्षाचे काम सुरु राहील असे पक्षातर्फे सांगण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT