Kohlapur News : राज्यातील महायुतीचे हे सरकार संविधानाला मानत नाही, सरकारकडून फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. कोल्हापुरात देखील आमच्या आमदारांना फोडले का? काँग्रेसने निवडून दिले, पण एका रात्रीत निघून गेलो. शिवसेनेला निवडून येण्याची खात्री होती तर हे करण्याची गरज नव्हती.
शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. उमेदवारी मिळणार नाही याची चर्चा झाली होती. त्यांना ते मान्य होते. अचानक काय माहिती नाही, शिवसेनेने चार्टर्ड विमान पाठवावा लागले. त्यांच्यावर उद्योगावर दबाव आणला का? मात्र जाधव कुटुंबीय हे प्रतिष्ठित कुटुंब आहे, त्यांना अशोभनीय आहे, असा विश्वास माजी मंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
महायुतीचे उमेदवाराबाबत प्रचंड नाराजी आहे. जनता अशा कामांना स्वीकारणार नाही. जयश्री जाधव यांनी घेतलेल्या निर्णयामुळे मला खंत वाटते, त्यांचा हा निर्णय दुर्दैवी आहे. मुख्यमंत्र्यांना घरीच दिवाळी साजरी करण्याची वेळ येईल, राज्यात माहविकास आघाडीचे सरकार येईल, असेही माजी मंत्री सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
जी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली. तशीच फोडाफोडी कोल्हापुरात झाली. कोल्हापुरातील काँग्रेसच्या माजी आमदार जयश्री जाधव यांना पक्षात घेतले. जे या पक्ष प्रवेशासाठी घेऊन गेलेत त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश करून घेतला. खासगी विमानाने त्यांना कोल्हापुरातून मुंबईला घेऊन गेले. त्यांच्यावर दबाव होता की आणखी काय होतं हे जयश्री जाधव सांगतील. मात्र, कोल्हापूरची जनता हे सहन करणार नाही. उमेदवारीबाबत त्यांच्याशी बोललो होतो, त्या नाराज नव्हत्या. मात्र, कोणता दबाव त्यांच्यावर होता हे त्याच सांगतील
जयश्रीताई यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होते. चंद्रकांत जाधव यांना निवडून आणण्यासाठी देखील जीवाचे रान केले होते. किमान त्यांनी जाताना किंवा काही अडचण असेल तर माझ्याशी बोलायला पाहिजे होते. अशा पद्धतीने फोडाफोडी करून कुणी कोंडीत पकडू शकत नाही, असेही सतेज पाटील यांनी स्पष्ट केले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.