Mulshi Panchayat Samiti Election : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत मुळशी तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. त्यातच मुळशीतील हाय होल्टेज लढत होत असलेल्या भुगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल पवार यांनी थेट राजीनामा देत 'मशाल' हाती घेतली आहे.
अनिल पवार हे शरद पवारांच्या जवळचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीपासूनच ते तयारीला लागले होते. आपली उमेदवारी पक्की समजून त्यांनी प्रचार देखील सुरू केला होता. तर, दगडू करंजावणे यांनी देखील निवडणुकीच्या आधीपासून भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे उमेदवारीची माळ कोणाच्या गळात पडणार याची उत्सुकता होती.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दगडू कारंजावणे यांना उमेदवारी देण्यात आली. अनिल पवार यांना उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्या पक्षाकडून उमेदवारी अर्ज देखील दाखल केला. तर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र दबडे, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून सुनीता उभे उमेदवार आहेत.
अनिल पवार यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, मला भुगाव पंचायत समिती गणातून उमेदवारीचा शब्द पक्षाकडून देण्यात आला होता. मग अखरेच्या क्षणी मला एबी फाॅर्म का नाकारण्यात आला? निष्ठावान सक्षम कार्यकर्त्यावर हा अन्याय नाही का? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा देत मला उमेदवारी देणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे.
भुगाव गणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची हक्काचे मतदान आहे.मात्र, दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना येथे स्वबळावर लढत आहेत. त्यामुळे विजयी उमेदवारातील विजयाचे अंतर फारच कमी राहणार आहे. त्यामुळे येथे होणाऱ्या मुख्य तिरंगी लढतीमध्ये कोणाचे पारडे जड राहणार या विषयी चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.