Pune Police News Sarkarnama
पुणे

ACB Action : पुणे पोलीस दलात खळबळ! मुख्यालयातच महिला एपीआयला २८ लाखांची लाच घेताना बेड्या

Pune Police Vaishali Totewar Bribe : पुणे पोलिस आयुक्तलयाच्या आवारात तब्बल 28 लाखांची लाच घेताना पोलिसांनी एपीआय महिलेलेला अटक केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुणे पोलfस दलाच्या गोटातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्या ठिकाणी कायद्याचे रक्षण होणे अपेक्षित असते, त्याच पोलिस आयुक्तालयाच्या आवारात लाचेचा मोठी 'डील' सुरू असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केला आहे.

आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली तोटेवार यांना तब्बल २८ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले.

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, वैशाली तोटेवार यांची नुकतीच मुंबई येथील लोहमार्ग विभागात बदली झाली होती. त्यांना पुणे शहर पोलीस दलातून कार्यमुक्त देखील करण्यात आले होते.

मात्र, बदली होऊनही पुण्यातील फाईल्सचा मोह त्यांना आवरता आला नसल्याचे दिसत आहे. पोलिस आयुक्तालयासारख्या संवेदनशील ठिकाणी इतकी मोठी रक्कम स्वीकारण्याची हिंमत त्यांनी दाखवल्याने एसीबीचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत.

२८ लाखांचे गौडबंगाल काय?

आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असताना त्यांनी नेमक्या कोणत्या प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी ही २८ लाखांची अवाढव्य रक्कम मागितली होती, याचा तपास आता एसीबी करत आहे. ही लाच तोटेवार स्वतःसाठी घेत होत्या की यात अजून कोणा मोठ्याचा वरदहस्त आहे, याबाबत शहरात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

तपास सुरू

मिळल्या माहितीनुसार, एसीबीने सापळा रचला आणि तोटेवार यांना २८ लाखांच्या रकमेसह जाळ्यात ओढले. सध्या त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्या मालमत्तेची आणि मागील काही काळातील संशयास्पद व्यवहारांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT