Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

हर्षवर्धन पाटील यांच्याविरोधात दिल्ली कोर्टाचे अटक वॉरंट; पण दिल्ली पोलिस...

इंदापूर पोलिस व दिल्ली पोलिस यांच्यामध्ये बऱ्याच वेळ खलबत्ते झाल्यानंतर संबंधित पोलिस पथक हे कारखाना कार्यक्षेत्राकडे गेल्याची चर्चा होती.

सरकारनामा ब्यूरो

इंदापूर : भारतीय जनता पक्षाचे (BJP) नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांना मोठा धक्का बसला आहे. दिल्ली (Delhi) न्यायालयाने (court) पाटील यांच्यासह पाच जणांच्या विरोधात एका आर्थिक प्रकरणात अटक वॉरंट जारी केले आहे. या प्रकरणी माजी मंत्री पाटील यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकलेली नाही. दरम्यान, दिल्लीहून इंदापुरात (Indapur) दाखल झालेले पोलिसांचे पथक आज (ता. २७ नोव्हेंबर) परत गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. (Arrest warrant of Delhi court against BJP leader Harshvardhan Patil)

इंदापूर तालुक्यातील बिजवडी येथील कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याशी निगडित आर्थिक व्यवहाराचे ते प्रकरण आहे. दिल्ली येथील न्यायालयामध्ये सैनिक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने २०१९ मध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखाना, हर्षवर्धन शहाजीराव पाटील यांचेसह अन्य चार जणांच्या विरोधात दावा दाखल केला होता.

या प्रकरणी सुनावणीस गैरहजर राहिल्याने न्यायालयाने हर्षवर्धन पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले. याची अंमलबजावणी करण्यासाठी दिल्ली येथून पाच पोलिसांचे पथक शुक्रवारी (ता. २५ रोजी) रात्री इंदापूर येथे आले होते. ही बातमी इंदापूर तालुक्यात वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली, त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली.

इंदापूर पोलिस व दिल्ली पोलिस यांच्यामध्ये बऱ्याच वेळ खलबत्ते झाल्यानंतर संबंधित पोलिस पथक हे कारखाना कार्यक्षेत्राकडे गेल्याची चर्चा होती. यावेळी त्यांच्याबरोबर कारखान्याचे एक जबाबदार अधिकारीही उपस्थित होते. मात्र, या वृत्तास अधिकृत दुजोरा मिळू शकलेला नाही. याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी, इंदापूरचे पोलिस निरीक्षक तसेच सहायक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधला. मात्र, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT