Arvind Kejriwal.jpg Sarkarnama
पुणे

AAP News: 'दिल्ली' गमावलेल्या केजरीवालांचा आता 'महाराष्ट्र'वर फोकस; स्थानिक स्वराज्य संस्थांंच्या निवडणुकीत ताकदीनं उतरणार

Arvind Kejriwal Politics: गेले दहा वर्ष दिल्लीमध्ये असलेली सत्ता गमावल्यानंतर आता महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी आम आदमी पक्षांनी केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभाच्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले. गेले दहा वर्ष दिल्लीमध्ये असलेली सत्ता गमावल्यानंतर आता महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये पूर्ण ताकदीनं उतरण्याची तयारी आम आदमी पक्षांनी (AAP) केली असल्याचं पाहायला मिळत आहे.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीनं स्थापनेपासूनच पक्षाने महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न केले आहेत मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे यश आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात मिळाल्याचं पाहायला मिळत नाही. आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीत असताना इतर राज्यांमध्ये देखील या सत्तेचा विस्तार व्हावा यासाठी आम आदमी पक्षाने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.

मात्र, पंजाब वगळता इतर ठिकाणी आम आदमी पार्टीला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. महाराष्ट्राला लागून असलेल्या गोवा राज्यामध्ये आम आदमी पक्षाला काहीसं यश मिळाल्याचे पाहायला मिळालं मात्र ते यश त्यांना टिकवता आलेलं नाही. यापूर्वीच्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवून देखील आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात कसलोच यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता आम आदमी पार्टी कडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न होऊ लागले आहेत.

आम आदमी पार्टीच्या राज्य समिती पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच पुण्यात पार पडली. या बैठकीमध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुका पूर्ण ताकतीने लढविण्यासंदर्भात ठराव मंजूर करण्यात आला.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतील सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून आम आदमी पार्टीने तयारीला सुरुवात केली. या निवडणुका आम आदमी पार्टी स्वबळावर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागांमध्ये आम आदमी पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्यांची यादी तयार करण्यात येणार आहेत.

आगामी महापालिका निवडणुका पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली लढविण्याचा ठराव देखील या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. याबाबत बोलताना विजय कुंभार म्हणाले, राज्यात होणाऱ्या सर्व महापालिका, नगरपालिका निवडणुका लढण्यासाठी आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. त्या अनुषंगाने महापालिका निवडणुकीचा हा कार्यक्रमही हाती घेण्यात आला आहे.

आम आदमी पार्टीच्या स्थापनेपासूनच पक्षाने महाराष्ट्रामध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न केले आहेत मात्र अद्याप कोणत्याही प्रकारचे यश आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात मिळाल्याचं पाहायला मिळत नाही. आम आदमी पक्षाची सत्ता दिल्लीत असताना इतर राज्यांमध्ये देखील या सत्तेचा विस्तार व्हावा यासाठी आम आदमी पक्षानं मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. मात्र, पंजाब वगळता इतर ठिकाणी आपला म्हणावं तितकं यश मिळालं नाही. राष्ट्रात देखील आपलं अस्तित्व अद्याप निर्माण करता आलेला नाही.

विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लढवून देखील आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात कसलंच यश मिळालेलं नाही. त्यामुळे आता आम आदमी पार्टीकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पाय रोवण्याचा प्रयत्न होऊ लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT