Shivsena UBT: पहावे ते नवलच! उद्धव ठाकरेंच्या खासदाराने गाठले भाजपचे कार्यालय; 'हे' आहे कारण

Uddhav Thackeray MP BJP Office News : शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून मोठ्या प्रमाणात माजी आमदार व दुसऱ्या फळीतील नेते महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने महाविकास आघाडीचा सुफडासाफ करीत मोठे यश मिळवले. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडीसोडून महायुतीमध्ये प्रवेश करणाऱ्याची संख्या वाढली आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून महायुतीकडील इनकमिंग वाढले आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातून मोठ्या प्रमाणात माजी आमदार व दुसऱ्या फळीतील नेते महायुतीमध्ये प्रवेश करीत आहेत.

विशेषतः शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. उद्धव ठाकरे यांच्या अनेक विश्वासू शिलेदारांनी त्यांची साथ सोडली असतानाच आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार भाजप कार्यालयात गेले. त्यांनी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे आता नव्यानेच पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

Uddhav Thackeray
MLC Election : इच्छुकांने वाढवले फडणवीसांचे टेन्शन; विधान परिषदेसाठी तब्बल 20 नावे भाजपने पाठवली दिल्ली दरबारी; कोणाला मिळणार उमेदवारी?

शिवसेना ठाकरे गटाचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला होता. त्यानंतर गड असलेल्या कोकणात मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना बसले. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचा गड असणाऱ्या नाशिकमध्ये मोठी घडामोड घडली आहे. ठाकरे गटाचे नाशिकमधील खासदार राजाभाऊ वाजे हे भाजप (BJP) आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या घरी गेले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी भाजप आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हिरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यामुळे चर्चेला उधाण आले आहे.

Uddhav Thackeray
MLC Election: भाजपच्या गोटातून मोठी अपडेट; विधानपरिषदेसाठी मराठवाड्याला संधी, 'या' दोनपैकी एक नाव होणार फायनल ?

यावेळी खासदार वाजे यांचा आमदार देवयांनी फरांदे यांनी भगवी शाल आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर दोघ नेत्यांमध्ये चर्चा झाली. भाजप आमदारांच्या भेटीनंतर राजाभाऊ वाजे हे भाजपच्या नाशिकमधील वसंत स्मृती कार्यालयात पोहचले. त्यांनी त्या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांची भेट घेतली. त्यामुळे या भेटीनंतर सर्वांच्या भुवया उंचावल्या.

Uddhav Thackeray
Eknath Shinde Politics: ठाकरेंच्या नेत्यांनं महाराष्ट्राचं राजकारण हादरवणारा बॉम्ब टाकला; दिल्लीत पहाटेच्यावेळी शिंदेंची काँग्रेस नेत्यांशी...

भाजप नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या या भेट घेण्यामागचे कारण शहर विकासाचे असल्याचे वाजे यांनी सांगितले आहे. मात्र खासदारांचा या भेटीने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. राजाभाऊ वाझे यांनी लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा पराभव केला होता. हेमंत गोडसे त्यावेळी विद्यामान खासदार होते. त्यामुळे येत्या काळात काय घडामोडी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Uddhav Thackeray
Eknath Shinde : सीएम फडणवीस अजितदादांनंतर आता शिंदेंना देणार 'हे' गिफ्ट; नियमात करणार बदल

नाशिक मतदारसंघावरून लोकसभा निवडणुकीत महायंतीचे मित्र पक्ष असलेल्या भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात जागेचा वाद झाला होता. त्यामुळे नाशिकची उमेदवारी खूप उशिराने जाहीर केली होती. त्यावेळी छगन भुजबळ लोकसभा लढवणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. परंतु उमेदवारी जाहीर होण्यात उशीर झाल्यामुळे भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. मात्र, आता पुन्हा एकदा नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे हे भाजप कार्यालयात गेले. त्यांनी भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

Uddhav Thackeray
Rohini Khadse: केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीच्या छेडछाडप्रकरणी रोहिणी खडसेंना वेगळाच संशय; म्हणाल्या...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com