Gopichand Padalkar- CM Uddhav Thackeray
Gopichand Padalkar- CM Uddhav Thackeray  sarkarnama
पुणे

मुख्यमंत्री सक्रिय होताच पडळकर यांनी वेधलं लक्ष

सरकारनामा ब्युरो

बारामती: प्रकृतीच्या कारणास्तव गेल्या काही दिवसांपासून राज्यकारभारात सक्रिय नसलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज वर्षा बंगल्यावर ध्वजारोहण केले. त्या आधी गेल्या आठवड्यात त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवादही साधला. यानंतर आता भाजप नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी मुख्यमंत्री बरे झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे. तसेच, राज्यातील स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडे लक्षही वेधले आहे.

''मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत सुधारली आहे, आणि ते आता सक्रीय झाले, हे ऐकून मला आनंद झाला. म्हणूनच मी आज जवळपास साडे तीन हजार एमपीएससी देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आपले लक्ष वेधतोय. संयुक्त पूर्वपरिक्षा २०२० मध्ये झालेला गोंधळ समोर आला आहे. नुकतेच उच्च न्यायालयाने ८६ विद्यार्थ्यांना मुख्य परिक्षेला बसण्याची परवानगी दिली.

पण उर्वरित विद्यार्थी आर्थिक अडचणीमुळे उच्च न्यायालयाचा दरवाचा ठोठावू शकले नाही. मग त्यांना न्याय मिळणार नाही का? त्यामुळेच त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. अशा विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर राज्य सरकारने त्वरीत विचार करावा. मला सरकारला हे सांगायचं की,एमपीएससीने प्रश्नपत्रिका व उत्तर तालिकेत गोंधळ घातला आहे हे, उच्च न्यायलयात सिद्ध झाले आहे.

याची दखल घेत राज्य सरकारने एमपीएससीला संपूर्ण विद्यार्थ्यांची जबाबदारी घेऊन त्वरित कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, असेही गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे. अन्यथा यात एखाद्याने स्वप्निल लोणकरसारखे पाऊल उचलले तर याला राज्य सरकार सर्वस्वी जबाबदारी असेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT