Ashok Chavan Sarkarnama
पुणे

Ashok Chavan : गेल्या वर्षीची अफवा, यंदा खरी ठरली; भाजपबाबत अशोक चव्हाण काय म्हणाले होते ?

Congress Vs BJP Politics 17 फेब्रुवारी २०२३ ला चव्हाणांनी भाजपमध्ये जाण्याबाबत स्पष्टपणे नकार दिला होता.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा गेल्या वर्षभरापासून होती. दरम्यान, चव्हाणांनी 17 फेब्रुवारी 2023 रोजी 'सरकारनामा'ला विशेष मुलाखत दिली होती. त्यावेळी त्यांनी ही अफावा असून जाणून बुजून पसरवण्यात येत असल्याचे सांगितले होते. तसेच ते काँग्रेसमध्येच राहणार असल्याचा दावाही केला होता.

यानंतर आज, 12 फेब्रुवारी 2024 म्हणजेच बरोबर एक वर्षांनी अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यासह आमदाराकीचाही राजीनामा दिला. त्यांनी दोन दिवसांत भूमिका स्पष्ट करणार असल्याचे सांगितले असले तरी ते भाजपमध्येच जाणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यामुळे गेल्या वर्षी होणाऱ्या चर्चांना चव्हाणांनी अफवा म्हटले होते, तीच अफवा यंदा खरी ठरल्याचे स्पष्ट झाले.

सरकारनामाशी बोलताना अशोक चव्हाणांनी (Ashok Chavan) भाजपमध्ये जाण्याची चर्चा माध्यमेच रंगवत असल्याचा आरोप केला होता. तसेच वारंवार भूमिका स्पष्ट करूनही याबाबत वारंवार खुलासा करण्याची वेळ येते, हे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी सागितले होते. ते म्हणाले, काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी झटतो. आता मला विरोध करणाऱ्यांना माझ्यापासून काही राजकीय अडचणी येत असतील, ते असे उद्योग करतात. त्याला मी जास्त महत्व देत नाही, असेही त्यांनी स्वपक्षातील नेत्यांना सुनावले होते.

यानंतर त्यांनी इतर पक्षातील सर्व नेत्यांशी माझे चांगले संबंध असल्याचेही स्पष्ट केले होते. ते म्हणाले, राजकारणात कुणी कुणाचाही दुश्मन नसतात. व्यक्तिगत वाद नसतो. राजकारणात वैचारिक मतभेद असतात. आम्ही विचारांना बांधलेलो आहोत, असे सांगून ते भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांवर पडदा टाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अशोक चव्हाण भाजपमध्ये (BJP) जाणार, ही चर्चा स्वपक्षियांकडून केली जात आहे, की भाजपचीच रणनीती आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला. याला उत्तर देताना चव्हाण म्हणाले, जेथे द्वेष असतो किंवा जेथे व्यक्तिगत विरोध असतो, तेथे पक्ष वगैरे काही नसते.हा कार्यक्रम सर्व पक्षात पाहायल मिळतो. त्यामुळे त्याला जास्त महत्व देत नाही. आता मी त्याच्या पलिकडे गेलेलो आहे. आता कुणी किती विरोध करत असेल त्यांना करू द्या. आपण आपले काम करत राहायचे. काम केल्यानंतर कामाचे कौतुक होत राहतेच. जे काम हाती घेतले तर ते करतो, नाही जमले तर सोडून देतो. त्यामुळे कुणाला काय वाटते, हा माझ्या विषयच नाही, असे म्हणत अशोक चव्हाणांनी ते भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांचे खंडन केले होते.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT