Ashok Chavan : जिकडे अशोक चव्हाण, तिकडे समर्थक आमदार? नांदेड काँग्रेसची वाट बिकट...

Nanded Congress News : अशोक चव्हाण यांच्या निर्णयाने आता चव्हाण यांच्यावरही गद्दारीचा शिक्का बसला आहे.
Ashok Chavan
Ashok ChavanSarkarnama
Published on
Updated on

Nanded Political News : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आमदारकी आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत महाविकास आघाडीला जोरदार झटका दिला. या झटक्याचे धक्के पुढील काळातही जाणवणार आहेत. विशेषतः मराठवाडा आणि नांदेड जिल्ह्यात या धक्यांनी काँग्रेसची वाट मात्र बिकट होणार आहे. काँग्रेस सोडल्यानंतर पुढचा निर्णय दोन दिवसात घेणार असे चव्हाण यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेण्यापूर्वी अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) भाजप प्रवेशाचे नक्की झाले आहे. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाची औपचारिकता तेवढी शिल्लक राहिली आहे. मराठवाड्यात आणि नांदेड जिल्ह्यात चव्हाण जिकडे, समर्थक आमदार तिकडे अशीच काहीशी परिस्थिती दिसते. परिणामी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसची वाट बिकट झाली आहे. राज्यात महाविकास आघाडी बळकट होत आहे असे वाटत असतानाच अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देत धक्का दिला.

Ashok Chavan
Ashok Chavan : अशोकराव, काँग्रेसकडून तुम्हाला आणखी काय हवे होते ?

जिल्ह्याच्या राजकारणात चव्हाण कुटुंबीयांचे वर्चस्व राहिले आहे. काँग्रेस पक्ष व गांधी घराण्याशी चव्हाण कायम एकनिष्ठ राहिले. पण अशोक चव्हाण यांच्या निर्णयाने आता चव्हाण यांच्यावरही गद्दारीचा शिक्का बसला आहे. दिवंगत डॉ. शंकरराव चव्हाण यांनी राज्याचे दोन वेळा मुख्यमंत्रीपद आणि केंद्रीय मंत्रीमंडळात महत्वाच्या जबाबदारी सांभाळल्या. तर अशोक चव्हाण हे पाच वेळा आमदार, दोन वेळा मुख्यमंत्री, दोन वेळा खासदार राहिले आहेत.

याशिवाय पक्षाच्या राज्य पातळीवरही त्यांच्याकडे महत्वाची जबादारी होती. नांदेड (Nanded) जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती, यासह काँग्रेसची विविध संस्थांमध्ये सत्ता आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघात चार निवडणुकांचा अपवाद वगळता काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत.आमदार माधवराव पाटील जवळगावकर, मोहन आण्णा हंबर्डे, जितेश आ़तपूरकर व स्वतः अशोक चव्हाण असे जिल्ह्यात काँग्रेसचे चार आमदार आहेत.

Ashok Chavan
Nilesh Rane : 'मी येतोय... हिशोब चुकता करायला!' कोकण तापलं

राज्यसभेच्या निवडणुकीमुळे समर्थक आमदार तटस्थ ?

चव्हाणांनी आमदाराकीचा राजीनामा दिला असला तरी इतर तिघांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. येणाऱ्या काळात काँग्रेसला अस्तित्व कायम ठेवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार आहे. माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी गेल्या वर्षी काँग्रेसमध्ये घरवापसी केली आहे. जिल्ह्यात काँग्रेसच्या माजी आमदार, ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

येणाऱ्या काळात या पदाधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशोक चव्हाण यांनी कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केले नाही. तसेच त्यांच्यासोबत नेमके किती आमदार पक्ष सोडणार हेही अद्याप स्पष्ट झाले नाही. राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीची घोषणा झाली असल्याने काँग्रेसचे सध्याचे संख्याबळ पाहता एक खासदार निवडून येऊ शकतो. पण अशोक चव्हाण यांच्यासोबत काही आमदार गेले तर राज्यसभेच्या निवडणुकीचे गणित बिघडू शकते. हे लक्षात घेऊन आमदार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Ashok Chavan
Dharashiv News : धाराशिवचा दुष्काळ संपणार? ; सांगली-कोल्हापुरातील पुराचे पाणी वळवलं जाणार!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com