Sambhaji Bhide on Ashok Kharat Case Sarkarnama
पुणे

Sambhaji Bhide on Ashok Kharat : खरात प्रकरणावर संभाजी भिडेंची संतप्त प्रतिक्रिया : दोन वाक्याताच मुळापासून विषय संपवण्याचा सल्ला

Sambhaji Bhide Statement on Ashok Kharat Case : अशोक खरातशी संबंधित अनेक मालमत्ता समोर येत आहेत. ज्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचं उघड होत आहे. त्यामुळे खरातशी संबंधित राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

Jagdish Patil

Pune News, 26 Mar : संपूर्ण राज्यभरात सध्या भोंदूबाबा अशोक खरातच्या कारनाम्यांची चर्चा जोरात सुरू आहे. त्याने केलेले काळे धंदे आणि त्याबाबतचे नवनवीन व्हिडिओ समोर आल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. खरातने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केल्याचं आणि त्यांना फसवल्याचं समोर येत आहे.

शिवाय अनेक पीडित महिला आता समोर येऊन त्याच्याविरोधात तक्रार करत आहेत. अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण देखील मोठा भूकंप आला आहे. अशातच आता या सर्व प्रकरणावर श्री शिवप्रतिष्ठानचे संस्थांपक संभाजी भिडे गुरुजी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

पत्रकारांनी खरात प्रकरणी प्रश्न विचारला असता संभाजी भिडे यांनी संतापून, "ती काय बोलण्याच्या लायकीची माणसं आहेत काय? अशोक खरातला मारून टाकून मोकळं व्हावं, खरात प्रकरणावर चर्चा सुद्धा करू नये", असं वक्तव्य केलं आहे. त्यामुळे नाशिक प्रकणावरून भिडे गुरूजी चांगलेच संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, भोंदू अशोक खरात प्रकरणाचा तपास एसआयटीच्या माध्यमातून होणार आहे. नाशिक पोलिसांकडे आतापर्यंत खरात विरोधात ८ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर वावी आणि सिन्नर पोलिसांकडील प्रत्येकी एक अशा १० गुन्हांचा एसआयटी तपास करणार आहे.

त्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे खरातशी संबंधित अनेक मालमत्ता समोर येत आहेत. ज्यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संबंध असल्याचं उघड होत आहे. त्यामुळे खरातशी संबंधित राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT