Ashram School Teacher Posting : आदिवासी विकास विभागांतर्गत आश्रमशाळांमध्ये शिक्षक पदस्थापनेबाबत राज्य शासनाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक पदभरतीमध्ये शिफारस झालेल्या पात्र उमेदवारांना आश्रमशाळांमध्ये पदस्थापना देताना केवळ रिक्त पदांचा विचार न करता विद्यार्थ्यांची संख्या, विषयाची गरज आणि उपलब्ध शिक्षकसंख्या यांचा प्राधान्याने विचार करण्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
आश्रमशाळांमध्ये काही ठिकाणी शिक्षकांची गरज मोठी असताना काही शाळांमध्ये रिक्त पदे तुलनेने कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शिक्षक पदस्थापनेची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत.
पवित्र पोर्टलवर शिफारस झालेल्या नव नियुक्त शिक्षकांना केवळ समुपदेशनाच्या माध्यमातून पदस्थापना न देता, आश्रमशाळांमधील उपलब्ध रिक्त पदांचे समप्रमाणात नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी संबंधित शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या आणि उपलब्ध शिक्षकांची स्थिती लक्षात घेऊन पदस्थापना करण्याची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांची रिक्त पदे आहेत. त्यामुळे प्रत्येक आश्रमशाळेत कोणत्या विषयाचे किती शिक्षक आवश्यक आहेत, याची प्रथम निश्चिती करावी. त्यानंतर संबंधित शाळेतील विद्यार्थीसंख्या आणि उपलब्ध शिक्षकांची संख्या विचारात घेऊन पदस्थापनेचे नियोजन करावे, असे शासनाने स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे आश्रमशाळांमध्ये सर्व विषयांसाठी आवश्यक शिक्षक उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. रिक्त पदे काही मोजक्या शाळांमध्ये केंद्रित न राहता गरजेनुसार समप्रमाणात भरली जातील, यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे.
नवीन शिक्षकांच्या पदस्थापनेची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यामुळे ‘रिक्त जागा आहे म्हणून पदस्थापना’ करण्याऐवजी संबंधित आश्रमशाळेतील विद्यार्थीसंख्या, विषयाची गरज आणि शिक्षकांची उपलब्धता यांचा मेळ घालून निर्णय घेतला जाणार आहे.
या निर्णयामुळे शिक्षकांच्या पदस्थापनेत काही शाळांमध्ये होणारी शिक्षकांची गर्दी आणि दुसरीकडे शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यास मदत होण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.