Manoj Jarange Patil: ‘एक भाकर समाजासाठी’! जरांगेंच्या आंदोलनासाठी नाशिककरांनी घेतली भोजनाची जबाबदारी

Nashik people arrange food for Jarange protest: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनासाठी नाशिकमधील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली असून, भोजन व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली आहे.
Manoj Jarange Patil Maratha reservation protest
Manoj Jarange PatilSarkarnama
Published on
Updated on

Nashik citizens support Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मात्र नाशिककर आंदोलनासाठी जोरदार तयारी करीत आहेत. नाशिकच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनासाठी बैठकांचा धडाका लावला आहे.

लासलगाव बाजार समिती आवारात मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. यावेळी मुंबईत आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणावर नाशिक जिल्ह्यातील महिला जातील अशी घोषणा करण्यात आली. आंदोलन यशस्वी करण्यासाठी कंबर कसण्याचा निर्णय झाला.

मुंबईला होणाऱ्या आंदोलनासाठी भोजनाची व्यवस्था नाशिकचे कार्यकर्ते करणार आहेत. यासंदर्भात लासलगाव येथील बैठकीत नियोजन करण्यात आले. त्याची तयारी करण्यासाठी काही कार्यकर्ते आज मुंबईला रवाना होणार आहेत.

मुंबईला रवाना होणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आंदोलनाच्या काळात कोणत्याही परिस्थितीत एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. मनोज जरांगे पाटील यांना पोलिसांनी परवानगी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

Manoj Jarange Patil Maratha reservation protest
School Leaving Certificate Correction: शाळा सोडल्यानंतरही दाखल्यातील चूक दुरुस्त होणार! न्यायालयाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

लासलगाव येथे झालेल्या बैठकीला विविध पक्षांचे आणि संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये बाजार समितीच्या संचालिका सोनिया होळकर, भास्कर झाल्टे, शिवा पाटील सुरासे, मंगेश कदम, अभिजीत डुकरे यांसह अनेक पदाधिकारी आणि मराठा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Manoj Jarange Patil Maratha reservation protest
Karnataka BJP: भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदावरूनही पायउतार

नाशिक नाशिक जिल्हा मुंबईला नियमितपणे भाजीपाला आणि अन्य वस्तू मोठ्या प्रमाणावर पुरवतो. त्यामुळे या आंदोलनासाठी येणाऱ्या समाज बांधवांना अन्नदानाची व्यवस्था समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी "एक भाकर समाजासाठी"या भावनेतून शिदोरी पुरविण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घेतली.

नाशिक शहरातून विविध भागात बैठका घेण्यात आल्याची माहिती कैलास खांडबहाले यांनी दिली. नाशिक शहरातील एक गट जरांगे पाटील यांच्या विरोधात द्वेषपूर्ण भावनेतून काम करीत आहे. सत्ताधारी पक्षासाठी मॅनेज झालेल्या कार्यकर्त्यांना कोणताही प्रतिसाद नाही असा दावा या पदाधिकाऱ्यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com