ADV. Asim Sarode Sarkarnama
पुणे

Asim Sarode: '' शिंदे फडणवीस सरकारचा 'लोकपाल' कायदा तकलादू, अण्णा हजारेंनी त्याला विरोध करावा!''

Asim Sarode On Lokpal Act : ...मग लोकायुक्त कायद्याला काय अर्थ राहिला?

सरकारनामा ब्यूरो

Asim Sarode On Lokpal Act : हिवाळी अधिवेशनात शिंदे फडणवीस सरकारकडून बहुचर्चित लोकायुक्त कायद्यासाठी जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. सोमवारी (दि.26) हे विधेयक विधिमंडळाच्या सभागृहात सादर करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. परंतू याचवेळी सरकारचा लोकपाल कायदा हा तकलादू असल्याची टीका मानवाधिकार कार्यकर्ते व अॅड. असीम सरोदे (Asim Sarode) यांनी केली आहे.

असीम सरोदे म्हणाले, सामान्य माणसांना भ्रष्टाचाराविरुद्ध काहीच करता येणार नाही असा तकलादू लोकपाल कायदा(Lokpal Act) उद्या विधानसभेत पास करून घेण्यात येईल. त्यानंतर हाताच्या पंजाची नागफणी करून टीव्ही चॅनेल्सला आपण किती महान लोकायुक्त कायदा आणला अशा मुलाखती दिल्या जातील. त्यामुळे आता लोकशाहीसाठी अनेकांनी हस्तक्षेप करावा अशी भूमिका सरोदे यांनी यावेळी मांडली आहे.

तसेच महाराष्ट्रासाठीचा लोकायुक्त कायदा निष्प्रभ करून विधानसभेत मांडला जाणार आहे. यातील तरतुदीनुसार मुख्यमंत्री, मंत्री, अधिकाऱ्यांची चौकशी परवानगी घेऊनच करावी लागणार आहे. मग लोकायुक्तला काय अर्थ राहिला? अण्णा हजारे (Anna Hazare) विश्वंभर चौधरी, श्याम असावा या समितीतील सदस्यांनी याचा विरोध करावा. तसेच नागरी अधिकारांसाठी बोलावे असेही सरोदे म्हणाले.

ताकदवान व प्रभावी लोकायुक्त कायदा असावा..

असीम सरोदे यांनी यावेळी माझे वृत्तपत्रांना आवाहन आहे की, ताकदवान व प्रभावी लोकायुक्त कायदा असावा यासाठी माध्यम-वकिली करावी, लोकांची बाजू मांडावी असंही आवाहन असीम सरोदे यांनी केलं. ताकदवान व प्रभावी लोकायुक्त कायदा आणण्यासाठी जर अण्णा हजारे, विश्वमभर चौधरी, श्याम असावा यांनी नागरिकांची बाजू जाहीर करावी व कायद्याची लढाई लढायची असेल तर न्यायालयीन कामात मी त्यांची वकिली करेन पण पारदर्शक लोकशाहीचा आग्रह त्यांनी केलाच पाहिजे असं आवाहनही केलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT