Eknath Shinde ajit Pawar devendra Fadnavis sarkarnama
पुणे

Shiv Sena: शिंदे सेनेची पुण्यात माघार; जिल्ह्यात 'या' दोन जागा लढणार

Maharashtra Assembly Election 2024 CM Eknath Shinde Shiv Sena: पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही इच्छुक उमेदवार नाही, या आठही जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

Mangesh Mahale

महाविकास आघाडीत पुण्यातील हडपसर विधानसभेची जागा लढवणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असताना दुसरीकडे पुण्यातील विधानसभा लढण्याचा दावा शिवसेनेने (Shiv Sena)सोडला आहे.

पुणे शहरातील एकाही जागेवर एकनाथ शिंदेंची (CM Eknath Shinde) शिवसेना उमेदवार देणार नाही,अशी माहिती विश्वसनीय सूत्रांची दिली आहे. तर पु्णे जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर या जागेवर शिंदेसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे.

पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही इच्छुक उमेदवार नाही, या आठही जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने हडपसर आणि कोथरूड या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून हडपसरमधून महादेव बाबर, कोथरुडमधून पृथ्वीराज सुतार,चंद्रकांत मोकाटे यांचा नावाची जोरदार चर्चा आहे.

महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांची जागा वाटपाबाबत खलबत्त सुरू असताना ठाकरे गटाच्या नेता सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभेच्या जागेवर उमेदवाराची घोषणा केल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (Sharad Pawar) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी आक्षेप घेतला आहे.

सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांच्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे. यामुळे आगामी काळामध्ये सुषमा अंधारे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष असा संघर्ष आणखी बळवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सुषमा अंधारे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे राहणार असून या मतदारसंघात माजी आमदार महादेव बाबर हे उमेदवार असतील, असे घोषित केले आहे. महादेव बाबर यांचे नाव ठाकरे गटाकडून जाहीर झाल्याने ते कामाला लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT