Haryana Election Result 2024: हरियाणात हॅट्रीक: मोदी- शाह यांची पक्षावरील पकड आणखी मजबूत

Haryana Assembly Election Result 2024 reasons for bjp win and congress loss: हरियाणात भाजपचा पराभव झाला असता तर नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या पक्षांतर्गत विरोधकांनी उचल खाल्ली असती. हरियाणात भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमताकडे सुरू आहे. त्यामुळे मोदी आणि शाह यांची पक्षसंघटनेवरील पकड आणखी मजबूत होणार आहे.
Haryana Assembly Election Result 2024
Haryana Assembly Election Result 2024Sarkarnama
Published on
Updated on

केंद्रात जे सरकार तेच राज्यातही असणार, असा कल हरियाणाच्या मतदारांनी पुन्हा एकदा दिला आहे. बहुतांश एक्झिट पोलचे अंदाज खोटे ठरवत भाजपची वाटचाल बहुमताकडे सुरू आहे. भाजप जिंकला आणि काँग्रेस हारला, एवढाच अर्थ या निवडणुकीचा नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जिंकले आणि त्यांचे पक्षांतर्गत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील विरोधक हारले, हा या निकालाचा त्यापेक्षा मोठा अर्थ आहे.

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते आणि आज मतमोजणी झाली. काँग्रेसची सत्ता येणार, असा अंदाज बहुतांश एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आला हता. मतमोजणी सुरू झाली आणि सकाळच्या टप्प्यात तसे चित्रही दिसू लागले होते. काँग्रेसने 60 जागांवर आघाडी घेतली होती. भाजप केवळ 20 जागांवर आघाडीवर होता. दुपार होईल तसा उलटफेर सुरू झाला आणि तो भाजपला स्पष्ट बहुमतापर्यंत नेणार, असे दिसू लागले. 2019 च्या निवडणुकीत भाजपला 40, काँग्रेसला 31 आणि जेजेपीला 10 जागा मिळाल्या होता.

दुपारपर्यंतच्या कलांनुसार भाजप 48 जागांवर आघाडीवर आहे, याचा अर्थ भाजपची वाटचाल स्पष्ट बहुमतााकडे सुरू आहे. काँग्रेसच्याही 5 जागा वाढताना दिसत आहेत, मात्र सत्ता मिळणार नाही, असे चित्र दिसत होते. गेल्या निवडणुकीत 10 जागा जिंकणारा जेजेपी एकाही जागेवर आघाडीवर नव्हता. 2019 मध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे जेजेपीला सोबत घेऊन सरकार स्थापन करावे लागले होते.

मनोहरलाल खट्टर मुख्यमंत्री बनले तर जेजेपीचे दुष्यंत चौटाला उपमुख्यमंत्री बनले होते. काही महिन्यांपूर्वी हरियाणात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. मुख्यमंत्री खट्टर यांना बदलण्यात आले. त्यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून नायब सैनी यांची निवड करण्यात आली. दुष्यंत चौटाला सरकारमधून बाहेर पडले होते.

Haryana Assembly Election Result 2024
Uddhav Thackeray : गद्दारांना 50 खोके अन् बहिणीला फक्त 1500 रुपये; मुलगी शिकली प्रगती झाली, पंधराशे देऊन घरी बसवली!

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात दिल्लीत झालेल्या आंदोलनात हरियणातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ते आंदोलन हाताळण्यात केंद्र सरकारला अपयश आले होते, शिवाय भाजपच्या काही नेत्यांनी या आंदोलनाबाबत वादग्रस्त विधाने केली होती. भाजपच्या खासदार कंगणा रनौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबात अलीकडेच वादग्रस्त विधाने केली होती.

महिला खेळाडूंच्या लैंगिक शोषणाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या हरियाणाच्या खेळाडूंना पोलिसांकडून अपमानास्पद वाागणूक मिळाली होती. ज्यांच्यावर आरोप आहेत, ते ब्रिजभूषण शरण सिंह हे भाजपचे माजी खासदार, राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष आहेत. या सर्व बाबींचा फटका भाजपला हरियाणा विधानसभा निवडणुकीत बसेल, असा अंदाज होता.

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटल्या. भाजपला स्वबळावर बहुमत मिळवू शकला नाही. त्यामुळे नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाच्या कुबड्या मोदी सरकारला घ्याव्या लागल्या आहेत. पक्षांतर्गत आणि संघातूवही मोदी, शाह यांना विरोध वाढल्याची चर्चा सुरू झाली होती.

हरियाणा आणि जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष बदलणार आणि मोदी, शाह यांचे विरोधक असलेल्या एका नेत्याची या पदावर वर्णी लागणार, अशी चर्चा सुरू झाली होती. हरियाणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोदी आणि शाह यांचे विरोधक आता जास्त हालचाली करू शकतील, असे वाटत नाही.

लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास वाढला आहे. हरियाणा विधानसभेच्या निकालाने त्याला काही प्रमाणात का होईना धक्का बसला आहे. निवडणुकीचा प्रचार सुरू असतानाच काँग्रेसच्या दिग्गज नेत्या कुमारी सेलजा या नाराज असल्याच्या बाातम्या आल्या होत्या. त्याचाही काँग्रेसला नक्कीच फटका बसला असणार. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधातील आंदोलनात आघाडीवर राहिलेल्या कुस्तीपटू विनेश फोगाटने काँग्रेसच्या उमेदवारीवर विजय मिळवला आहे. विनेश ही पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरली होती. त्यानंतर तिने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि पहिल्याच यादीत तिला उमेदवारी मिळाली होती.

Haryana Assembly Election Result 2024
Supriya Sule: पुण्यातील 'या' जागेवरुन आघाडीत बिघाडी? "सुषमाताई, त्या मीटिंगमध्ये होत्या का?

माजी उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्या जेजेपीचा दारुण पराभव होताना दिसत आहे. शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना आपण भापजपसोबत सरकारमध्ये होते, ही आय़ुष्यातील सर्वात मोठी चूक होती,असे विधान त्यांनी प्रचारादरम्यान केले होते. मात्र त्याचा काहीही उपयोग झाल्याचे दिसत नाही. गेल्या निवडणुकीत 10 जागा जिंकणाऱ्या जेजेपीला दुपारपर्यंत एकाही जागेवर आघाडी मिळालेली दिसत नव्हती.

हरियाणात भाजपचे सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन होत आहे. हरियाणात असे पहिल्यांदाच घडत आहे. मुख्यमंत्री बदलल्यामुळे भाजपला फटका बसणार असे सांगितले जाात होते, मात्र मोदी, शाह यांचे हे धक्कातंत्र यशस्वी ठरले. शेतकरी आंदोलन, खेळाडूंचे आंदोलन आणि सरकारबाबतच्या अँटीइन्कमबन्सीच्या जोरावर सत्ता मिळवण्यासाठी काँग्रेस सत्ता स्थापनेसाठी सज्ज झाला होता, मात्र काँग्रेसचे प्रयत्न अपुरे पडले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com