Sharad Pawar News : बारामतीमध्ये युगेंद्र पवार यांच्या सांगता सभेत शरद पवारांनी बारामतीच्या राजकारणात माझी पिढी माझ्यानंतर अजितची पिढी आणि आता नवी पिढी ही युगेंद्रची पिढी, असे म्हणत युगेंद्र पवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
शरद पवार म्हणाले, 1967 साली मला तुमच्यातील वडिलधाऱ्यांनी आमदार केलं. मी 20 वर्ष आमदार, मंत्री, मुख्यमंत्री या पदावर होतो.मला ठरवावं लागलं नवी पिढी आणावी लागेल. मी अजितदादाला आणलं. 20-25 वर्ष त्यानी बघितलं. पक्षाने त्यांना संधी दिली. त्यांना एकदा दोनदा तिनदा उपमुख्यमंत्री केलं. काम करण्याचा अधिकार दिला. त्यांनी काम केलं माझी काही तक्रार नाही. आता पुढं काय करायचं.पुढं माझ्या पिढी माझ्यानंतर अजितची पिढी आणि त्यानंतरची नवी पिढी युगेंद्रची पिढी.
यावेळी आम्ही तरुण पिढीच्या हाती सत्ता द्यायचं ठरवलं आहे. युगेंद्र यांची निवड केली आहे. लोकांसाठी काम करायची त्याची मनापासून इच्छा आहे. म्हणून प्रश्न सोडवण्याची धमक आणि ताकद त्याच्यात आहे. त्याला बारामतीचा प्रतिनिधी म्हणून पाठवायचे, असे आवाहन देखील शरद पवारांनी केले
आज महासभेच्या विधानसभेच्या एक वर्षाच्या आसपास लोकसभेची निवडणूक आपण केली. लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटची जाहीर सभा केली. आपण सगळ्यांच्या उपस्थित केली होती. लोकसभेच्या निकालाने देशाला महाराष्ट्र काय चीज आहे, हे दाखवून दिले.
सरकारने लाडकी बहीण योजना आणली. महिलांसाठी योजना आणली त्याला माझा विरोध असण्याचे कारण नाही. मात्र, 67 हजार भगिनींवर अत्याचार झाले. 67 हजार मुली भगिनी महाराष्ट्रात बेपत्ता आहेत. या भगिनी कुठे गेल्या? हे सांगायला धमक लागते ती त्यांच्यात नाही, असे शरद पवार म्हणाले.
बारामतीचा भाग अजुबाजुचा भाग शेती करणाऱ्यांचा भाग आहे. शेतकरी हा महत्त्वाचा घटक आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या केल्या. सरकारने 16 उद्योगपतींचे 18 हजार कोटींचे कर्ज माफ केले. पण शेतकऱ्यांचे दोन हजार कोटींचे कर्ज माफ केले नाही. त्यामुळे त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही, असा निकाल तुम्ही दिला पाहिजे, असे आव्हान पवारांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.